AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI: मालिका सहज जिंकलो असतो पण त्यांनी चांगली कामगिरी केलीच नाही…श्रेयसने थेट नावच घेतली अन् झापलं

IND vs WI 5th T20: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी-२० मालिका पार पडली जी भारतीय संघाने गमावली. आता मालिका गमावल्यानंतर श्रेयसने सांगितले कोणामुळे मालिका गमवावी लागली.

IND vs WI: मालिका सहज जिंकलो असतो पण त्यांनी चांगली कामगिरी केलीच नाही...श्रेयसने थेट नावच घेतली अन् झापलं
| Updated on: Oct 18, 2026 | 7:42 AM
Share

IND vs WI 5th T20 Match: बंगळूरु येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचवा आणि अंतिम टी२० सामना अखेरीस पावसामुळे रद्द झाला. मुसळधार पाऊस आणि ओल्या मैदानामुळे, सामना सुरुवातीला प्रत्येकी ९ षटकांचा करण्यात आला, परंतु भारतीय डावाच्या ७.४ षटकांनंतर खेळ पुन्हा सुरू झाला नाही. सामना अनिर्णित राहिल्याने, पाच सामन्यांची टी२० मालिका २-२ अशी बरोबरीत संपली.

मालिकेनंतर श्रेयस अय्यर काय म्हणाला?

मालिका अनिर्णित राहिल्यानंतर, भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने कबूल केले की, “जर संघाने काही सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी केली असती, तर निकाल भारताच्या बाजूने लागला असता.” त्याने वेस्ट इंडिज संघ आणि त्यांचा कर्णधार शाई होप यांचे कौतुक केले, ज्यांनी संपूर्ण मालिकेत भारतीय गोलंदाजांवर दबाव कायम ठेवला आणि आपल्या संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली.” श्रेयसने अप्रत्यक्षरित्या संपूर्ण गोलंदाजांना आता धारेवर धरले आहे आणि त्यांना मालिका गमावण्यामागे व्हिलन ठरवलं आहे.

सामन्यानंतरच्या सादरीकरणादरम्यान, कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला, “जर आम्ही दुसऱ्या आणि चौथ्या टी-२० सामन्यात चांगली गोलंदाजी केली असती, तर निकाल वेगळा लागला असता. कॅरिबियन फलंदाजांनी संपूर्ण मालिकेत उत्कृष्ट फलंदाजी केली आणि त्यांचे क्रेडिट मी त्यांना देतो. विशेषतः शाई होपची कामगिरी कौतुकास्पद होती. पराभवानंतरही पुनरागमन करण्याची त्याची क्षमता उत्कृष्ट होती. आमची आक्रमक मानसिकता कायम आहे आणि आम्ही त्याच शैलीत क्रिकेट खेळत राहू.”

सध्या सुरू असलेले दौरे आणि प्रवासाच्या वेळापत्रकाबाबत भारतीय कर्णधाराने संघाची वृत्ती सामान्य असल्याचे सांगितले. तो म्हणाला, “आमच्यासाठी हा इतर दिवसांसारखाच आहे. भारतात सततचा प्रवास ही काही नवीन गोष्ट नाही. आम्ही हे बऱ्याच काळापासून करत आलो आहोत आणि संपूर्ण संघ ते खूप चांगल्या प्रकारे सांभाळत आहे.”

आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मालिका खेळली जाईल. ही मालिका भारतात नाही तर न्यूझीलंडमध्ये रंगणार आहे. यासाठी भारतीय संघ लगेचच न्यूझीलंडमध्ये दाखल होईल, कारण टी-२० मालिकेला आता २२ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट