Team India : ठरलं, सूर्यकुमार यादवच्या जागी भारताच्या T20 टीमचा पुढचा कॅप्टन कोण होणार, आज होऊ शकते घोषणा

Team India : भारताच्या T20 टीमचा पुढचा कॅप्टन कोण असेल? या बद्दलचा सस्पेन्स संपणार आहे. आता फक्त अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. सूर्यकुमार यादवला हटवलं जाणार हे जवळपास निश्चित आहे.

Team India : ठरलं, सूर्यकुमार यादवच्या जागी भारताच्या T20 टीमचा पुढचा कॅप्टन कोण होणार, आज होऊ शकते घोषणा
suryakumar yadav
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 04, 2026 | 7:56 AM

टीम इंडियाच्या T20 कॅप्टनपदावरुन सूर्यकुमार यादवला हटवलं जाणार हे जवळपास निश्चित झालं आहे. सूर्याची जागा कोण घेणार? ते देखील ठरलं आहे. दैनिक जागरणच्या एका वृत्तानुसार BCCI च्या एपेक्स काउंसिलची गुरुवारी ऑनलाइन बैठक होणार आहे. त्या बैठकीत नव्या कॅप्टनच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. टीम इंडियाचा नवीन T20 कॅप्टन श्रेयस अय्यर असेल. टीम इंडियाचा नवीन T20 कॅप्टन कोण होणार? याची बरीच चर्चा सुरु होती. तो सस्पेन्स आता संपणार आहे. BCCI च्या एपेक्स काउंसिलच्या बैठकीत श्रेयस अय्यरच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर चीफ सिलेक्टर अजित आगरकर या निर्णयासंबंधी इतर सिलेक्टर्सना माहिती देतील.

अशी सुद्धा बातमी आहे की, भारतीय क्रिकेट संघाच्या T20 टीमच्या कॅप्टनशिपसाठी टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर यांचं मत संजू सॅमसनच्या बाजूने होतं. पण चीफ सिलेक्टर अजित आगरकर गंभीर यांच्या मताशी सहमत नव्हते. आता परस्पर सहमतीने श्रेयस अय्यरला पुढचं टी20 कॅप्टन बनवण्यावर एकमत झालं आहे. आर्यलंड आणि इंग्लंड दौऱ्यावर श्रेयस टीमचं नेतृत्व करेल. या दौऱ्यासाठी 6 जून रोजी शनिवारी टीमची निवड होणार आहे. या बैठकीत तुम्हाला कॅप्टन म्हणून श्रेयस अय्यर दिसू शकतो.

टीम इंडियाचा T20 मध्ये उपकर्णधार कोण असेल?

मीडिया रिपोर्ट्सनुसार श्रेयस अय्यरला पुढचा T20 कॅप्टन बनवण्यासह टीम इंडियाच्या उपकर्णधाराच्या निवडीवरही शिक्कामोर्तब होऊ शकतं. तिलक वर्मा टीमचा पुढचा व्हाइस कॅप्टन असेल. तो अक्षर पटेलची जागा घेईल. भारताच्या टी20 संघात स्थान मिळवण्यासाठी रजत पाटीदारला अजून प्रतिक्षा करावी लागू शकते. RCB ला सलग दोनवेळा IPL चॅम्पियन बनवणारा रजत पाटीदार सुद्धा कॅप्टनशिपसाठी एक दावेदार होता. पण BCCI चा रजत पाटीदारवर तितका विश्वास दिसत नाहीय.

BCCI त्याच्यावर इतकी प्रभावित का?

BCCI श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाने जास्त प्रभावित झाली आहे. IPL 2025 मध्ये पंजाब किंग्सचा श्रेयस कॅप्टन बनला. त्याच्या नेतृत्वाखाली टीमने फायनल गाठली. त्याआधी तो दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार होता. तिथे सुद्धा श्रेयसने छाप उमटवली. अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाइट रायडर्सने IPL 2024 चा किताब जिंकला होता. पण भारतीय संघाच्या टी 20 कॅप्टनशिपसाठी श्रेयस अय्यरचं फेवरेट आहे.

 

Follow Us