AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suryakumar Yadav : सूर्यकुमारचा टी 20 कर्णधारपदावरुन पत्ता कट;टीममधूनही डच्चू मिळणार!

Team India Suryakumar Yadav : सूर्याची गेल्या अनेक महिन्यांपासून बॅटिंगने हारकीरी सूरुच आहे. सूर्याला टीम इंडियानंतर आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातही काही खास करता आलं नाही. त्यामुळे आता सूर्याला त्याची खूर्ची गमवावी लागणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Suryakumar Yadav : सूर्यकुमारचा टी 20 कर्णधारपदावरुन पत्ता कट;टीममधूनही डच्चू मिळणार!
Suryakumar Yadav Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Jun 04, 2026 | 2:14 AM
Share

भारतीय क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी आणि अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बीसीसीआय सूर्यकुमार यादव याला टीम इंडियाच्या टी 20i कर्णधारपदावरुन हटवण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नाही तर निवड समितीकडून सूर्याला आगामी टी 20i मालिकेसाठी भारतीय संघातून डच्चू देण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. सूर्याने टी 20i संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून जबरदस्त कामगिरी केली आहे. मात्र सूर्या फलंदाज म्हणून सपशेल अपयशी ठरला आहे. सूर्याला अपवाद वगळता टी 20i क्रिकेटमध्ये त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे बीसीसीआय येत्या काही तासांत सूर्याबाबत मोठा निर्णय जाहीर करणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता बीसीसीआय सूर्याबाबत काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सूर्याच्या नेतृत्वात टीम इंडियाची कामगिरी

रोहित शर्मा याने त्याच्या नेतृत्वात वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर 2024 साली टी 20i क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. रोहितनंतर बीसीसीआयने सूर्यकुमार याला नेतृत्वाची जबाबदारी दिली. सूर्याने सार्थपणे रोहितचा वारसा चालवत स्वत:ला कर्णधार म्हणून सिद्ध केलं. सूर्याला नेतृत्वाची जबाबदारी दिली तेव्हा तो टी 20i क्रिकेटमधील नंबर 1 फलंदाज होता.

सूर्याने त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाला सलग 8 टी 20i मालिकांमध्ये विजयी केलं. तसेच टीम इंडियाने सूर्याच्याच नेतृत्वात पाकिस्तानला पराभूत करुन आशिया कप ट्रॉफी जिंकली. त्यानंतर टीम इंडियाने टी 20i वर्ल्ड कप जिंकला.

सूर्याची आकडेवारी

सूर्याने 2024 आणि 2025 या 2 वर्षात घोर निराशा केली. सूर्याला 2024 साली फक्त 429 धावा करता आल्या. तर सूर्याने 2025 साली 19 डावात 218 धावा केल्या. तर सूर्याने 2026 वर्षात 44 च्या सरासरीने 484 धावा केल्या. मात्र सूर्याला टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत बॅटिंगने खास योगदान देता आलं नाही.

सूर्याची जागा कोण घेणार?

दरम्यान आता सूर्यकुमार यादव याच्या जागी कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. टी 20i कॅप्टन म्हणून श्रेयस अय्यर हा तगडा दावेदार आहे.  श्रेयसला आयपीएल स्पर्धेत नेतृत्वाचा तगडा अनुभव आहे. तसेच तिलक वर्मा याचंही नाव चर्चेत आहे. त्यामुळे आता येत्या दिवसात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...