शुभमन गिलची शतकी गर्जना! वेस्ट इंडिजविरुद्ध कर्णधाराचं शानदार शतक; रचला मोठा विक्रम
Shubman Gill Century: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला सामना तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने २९५ धावा केल्या आहे. यावेळी शुभमन गिलने शतक ठोकले आहे.

टीम इंडियाचा स्टार कर्णधार शुभमन गिल आपला जबरदस्त फॉर्म कायम ठेवत पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजशी भिडत आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर आमनेसामने आले आणि विंडीजने पहिल्या डावात २९५ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांना फलंदाजीसाठी बोलावून आपल्या डावाची सुरुवात केली. सामन्याच्या सुरुवातीलाच रोहित बाद झाला असला तरी शुभमन गिलची खेळी लक्षवेधी ठरली.
शुभमन गिलने विंडीजच्या गोलंदाजांना मैदानाच्या सर्व बाजूंनी चोप देत आपले १० वे एकदिवसीय शतक झळकावले. त्याने अवघ्या ९६ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले आहे. भारताला लक्ष्याच्या जवळ पोहोचवले आहे. यासोबतच शुभमन गिलने वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार शतक झळकावून अनेक विक्रम मोडले आहेत. गिलने अवघ्या ९६ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. हे शुभमनचे १० वे एकदिवसीय शतक असून वेस्ट इंडिजविरुद्धचे त्याचे हे पहिलेच शतक आहे.
📸 Frames of a 𝙂𝙞𝙡𝙡𝙤𝙧𝙞𝙤𝙪𝙨 𝘾𝙚𝙣𝙩𝙪𝙧𝙮 💯🫡
Updates ▶️ https://t.co/O2cs86p4gq
#TeamIndia | #INDvWI | @mflone_ | @ShubmanGill https://t.co/CCeFrPKdSf
— BCCI (@BCCI) September 27, 2026
या शतकानंतर एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत शुभमन गिलने महेंद्रसिंग धोनीची बरोबरी केली आहे. एमएस धोनीच्या नावावरही एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० शतके आहेत. गिलने ४९ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. शुभमन गिल एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात कमी डावांमध्ये १० शतके करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. आतापर्यंत हा विक्रम शिखर धवनच्या नावावर होता. या माजी सलामीवीराने भारतासाठी आपले १० वे शतक ७७ डावांमध्ये झळकावले होते.
शुभमन गिलने आपले १० वे शतक केवळ ६७ व्या डावात पूर्ण केले आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी डावांमध्ये १० शतके करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकच्या नावावर आहे. त्याने ५५ डावांमध्ये १० शतके झळकावली होती. शुभमन गिलने २०२६ मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये भरपूर धावा केल्या आहेत. हा या वर्षातील त्याचा १०वा सामना आहे.
आतापर्यंत त्याने नऊ डावांमध्ये पाच अर्धशतके आणि दोन शतके झळकावली आहेत. या काळात गिल एकेरी धावसंख्येवर कधीही बाद झालेला नाही. तो यावर्षी एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही आहे. त्याची फलंदाजीची सरासरी १०० पेक्षा जास्त आहे. गिलने आपली १५४ धावांची खेळी लखनौमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध केली होती.