IND vs NZ ODI मालिका सुरु होण्यापूर्वीच शुभमन गिलची रडारड सुरु, तक्रार करत म्हणाला की…

Shubman Gill On IND vs NZ ODI Schedule: भारतीय पुरुष संघाचा कर्णधार शुभमन गिलने आता एक तक्रार केली आहे. मालिका सुरु होण्यापूर्वी एक मोठे विधान केले आहे.

IND vs NZ ODI मालिका सुरु होण्यापूर्वीच शुभमन गिलची रडारड सुरु, तक्रार करत म्हणाला की...
| Updated on: Nov 03, 2026 | 1:37 PM

Shubman Gill On IND vs NZ ODI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिका नुकतीच पार पडली जी भारतीय संघाने जिंकली. आता भारतीय संघ न्यूझीलंडचा पुन्हा सामना करणार आहे पण वनडे मालिकेत. या मालिकेपूर्वी भारतीय कर्णधार शुभमन गिलने काल माध्यमांशी संवाद साधला. यावेळी गिलने अनेक प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरही दिली. यावेळी त्याने एक तक्रारही केली.

गिलची मालिका सुरु होण्यापूर्वी तक्रार?

Loading...

ऑकलंडमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी, भारतीय कर्णधार शुभमन गिलने वेळापत्रकावर आपले मत व्यक्त केले. गिल म्हणाला की, “जर माझ्या हातात असते, तर मी एकदिवसीय आणि कसोटी मालिकेच्या मध्ये एक टी-२० मालिका आयोजित केली असती.” जून २०२७ मधील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२७ मधील एकदिवसीय विश्वचषक, हे दोन्ही भारतासाठी महत्त्वाचे आहेत. एकदिवसीय आणि कसोटी मालिकेमध्ये कमी अंतर असल्यामुळे, जसप्रीत बुमराहला संपूर्ण एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे, तर गिलसह अनेक कसोटी खेळाडू चौथा आणि पाचवा एकदिवसीय सामना खेळणार नाहीत.

गिल काय म्हणाला?

शुभमन गिल म्हणाला, “जर माझ्या हातात असते आणि सर्व खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त असते, तर आमच्या विश्वचषक संघातील सर्व प्रमुख खेळाडूंनी पाचही एकदिवसीय सामने खेळावेत अशी माझी इच्छा होती. पण कसोटी मालिकाही तितकीच महत्त्वाची आहे. जर आधी एकदिवसीय सामने, मग टी-२० आणि शेवटी कसोटी मालिका असती, तर आम्ही पूर्ण ताकदीने खेळू शकलो असतो.” एकूणच, शुभमन गिल भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्याच्या वेळापत्रकावर नाराज होता. त्याला वेळापत्रकात काही बदल हवे होते.

दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला २-१ ने पराभूत केल्यानंतर, डब्ल्यूटीसी गुणतालिका खूपच रंजक झाली आहे. गिलने आशा व्यक्त केली की, न्यूझीलंडमधील दोन कसोटी आणि त्यानंतर मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून भारत डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचू शकेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us