Vaibhav Sooryavanshi: मॅचविनरला दुखापत अन् वैभव सूर्यवंशीला लागली लॉटरी, दुसऱ्या मॅचमध्ये खेळणार, बॅटिंग कोच म्हणाले…
Vaibhav Sooryavanshi IND vs NZ 2nd T20: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा टी-२० सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार असल्याचे बॅटिंग कोचने म्हणून दाखवलं आहे, पण आता कोणाला बाहेर बसावं लागणार हे पण सांगितले आहे.

IND vs NZ 2nd T20 Match: भारतीय क्रिकेट संघाचा १५ वर्षीय डावखुरा फलंदाज वैभव सूर्यवंशीचे नशीब उजळले आहे. त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळू शकते. भारताचा एक प्रमुख फलंदाज जखमी झाल्यामुळे, त्याला बऱ्याच कालावधीनंतर भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळू शकते. विविध माध्यमांच्या वृत्तानुसार, वैभव सूर्यवंशीला दुसऱ्या टी-२० सामन्यात संधी मिळू शकते.
वैभव सूर्यवंशीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इशान किशनच्या दुखापतीमुळे, हा १५ वर्षीय खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. हा सामना २४ फेब्रुवारी रोजी क्राइस्टचर्च येथे होणार आहे, जिथे पहिला टी२० सामनाही खेळला गेला होता. क्राइस्टचर्चमधील पहिल्या सामन्यात भारताच्या विजयानंतर फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी वैभवच्या सहभागाचे संकेत दिले होते.
रेव्हस्पोर्ट्झच्या एका प्रश्नाला उत्तर देताना, भारतीय फलंदाजी प्रशिक्षकांनी स्पष्ट केले की, “इशान किशनला मांडीच्या स्नायूंची किरकोळ दुखापत आहे, त्यामुळेच तिलक वर्माला फलंदाजीच्या क्रमात तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, इशान दुसऱ्या टी२० सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. जर इशान किशन खेळला नाही, तर वैभव सूर्यवंशीच्या खेळण्याची चांगली संधी आहे.”
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी२० सामना क्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी२० सामना शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. पहिल्या सामन्याप्रमाणेच हा सामना दुपारी १२:३० वाजता सुरू होईल. दुपारी १२ वाजता नाणेफेक होईल. भारतीय संघाने पहिला टी-२० सामना जिंकून मालिकेची सुरुवात चांगली केली आहे. पहिला सामना भारतीय संघाने चार विकेट्सने जिंकला. आता पुढील सामने ही असेच जिंकले तर भारतीय संघाला मालिका जिंकणे सोपे होईल. वैभव सूर्यवंशीला संधी मिळाली तर चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. वैभव जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा तेव्हा धुमाकुळ घालतो.
