AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल आधी या दिग्गज खेळाडूचा क्रिकेटला अलविदा, 17 वर्षांचं क्रिकेट करिअर, दिल्लीच्या संघातही समावेश

दिल्ली डेअरडेविल्सचा (delhi daredevils) माजी खेळाडू रॉबी फ्रीलिंक (Robbie Frylinck) याने आपल्या 17 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतलाय.

आयपीएल आधी या दिग्गज खेळाडूचा क्रिकेटला अलविदा, 17 वर्षांचं क्रिकेट करिअर, दिल्लीच्या संघातही समावेश
Robbie Frylinck
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Mar 31, 2021 | 1:32 PM
Share

मुंबई :  आयपीएलचा (IPL 2021) रणसंग्राम येत्या 9 एप्रिलपासून सुरु होत आहे. त्याअगोदर दिल्ली डेअरडेविल्सचा (delhi daredevils) माजी खेळाडू रॉबी फ्रीलिंक (Robbie Frylinck) याने आपल्या 17 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतलाय. साऊथ आफ्रिकेकडून खेळताना त्याने काही अविस्मरणीय इनिंग खेळल्या. तसंच आयपीएलच्या दिल्ली डेअरडेविल्स संघाचाही तो भाग राहिला. आयपीएल 2011 च्या हंगामात रॉबी फ्रीलिंक दिल्लीकडून खेळला. (South Africa All Rounders Robbie Frylinck retirement From IPL Cricket)

रॉबीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द थोडी कमी राहिली पण त्याने देशांतर्गत क्रिकेट गाजवलं. त्याच्या17 वर्षांच्या क्रिकेट करिअरमध्ये त्याने 500 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या. साऊथ आफ्रिलेचा दिग्गज गोलंदाज डेल स्टेनने निवृत्तीच्या निर्णयानंतर त्याला उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दक्षिण आफ्रिका संघात सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूमध्ये गणना

रॉबीने 2004 साठी प्रोफेशनल क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं. 2005 मध्ये फर्स्ट क्लासमध्ये पदार्पण केलं. 2008 मध्ये त्याने नायवेल्ड लॉइंसकडून खेळण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान त्याने स्वतला एक सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून सिद्ध केलं होतं. त्याची तुलना दक्षिण आफ्रिकेचे लांस क्लूजनर यांच्याशी केली गेली. रॉबीचा 2011 मध्ये दिल्लीच्या संघात समावेश झाला होता. परंतु दिल्लीच्या संघाकडून त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. नंतर त्याला रिलीज केलं गेलं. त्यानंतर त्याने 2017 साली बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये टारगर्स संघाकडून खेळला.

निवृत्तीची घोषणा करताना डोळ्यात पाणी

निवृतीवेळी रॉबी भावूक झाल्याचं पाहायला मिळाला. तो म्हणाला, कोणताही खेळाडू आपल्या क्रिकेट करिअरमध्ये अशा क्षणाची वाट पाहत नाही ज्या क्षणाला त्याच्या डोळ्यात पाणी येतं. आज मी क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅटमधून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर करतोय. 17 वर्षांच्या क्रिकेट करिअरमध्ये मला अनेक सुखद क्षण अनुभवायला मिळाले, असं म्हणत रॉबीने क्रिकेट रसिकांचे आभार मानले.

रॉबी फ्रीलिंकचं क्रिकेट करिअर

रॉबीने साऊथ आफ्रिकेसाठी 3 टी ट्वेन्टी सामने खेळले. ज्यात त्याने 5 विकेट्स घेतल्या. तर 75 फर्स्ट मॅच खेळताना त्याने 228 विकेट्स मिळवल्या. यामध्ये 30 रन्समध्ये त्याने 8 फलंदाजांना माघारी धाडलं. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने 11 वेळा 5 विकेट्स पेक्षा अधिक विकेट्स मिळवल्या.. तसंच दोन वेळा 10 विकेट्स मिळवल्या. रॉबीने 137 लिस्ट ए मॅचमध्ये 168 विकेट्स मिळवल्या.

(South Africa All Rounders Robbie Frylinck retirement From IPL Cricket)

हे ही वाचा :

IPL 2021 : चेन्नईच्या भविष्याविषयी महत्त्वाची ‘आकाशवाणी’, ‘पहिल्या 5 पैकी 3 सामने जिंकले तरी मोठी गोष्ट!’

मोठी बातमी : भारत पाकिस्तान आमने-सामने येणार, एप्रिलमध्ये तिरंगी टी ट्वेन्टी मालिका

IPL 2021 : सिनिअर खेळाडूंना बाजूला सारत रिषभ पंत दिल्लीच्या कर्णधारपदी, सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं ‘ट्रोलिंग वर्क!’

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...