Sunil Gavaskar : सगळ्या देशाचा हिरो ठरलेल्या मोहित उलवाच्या लास्ट बॉलवरच्या बाऊंड्री मध्ये गावस्करांना त्याच्यात कोणाची झलक दिसली?

Sunil Gavaskar : मोहित उलवा आज सगळ्या देशाचा हिरो ठरला आहे. पाकिस्तान विरुद्ध अशक्यप्राय वाटणारा विजय त्याने मिळवून दिला. आठ विकेट गेले त्यावेळी स्कोर 252 रन्स होता. विजयासाठी 80 पेक्षा जास्त धावांची गरज होती.

Sunil Gavaskar : सगळ्या देशाचा हिरो ठरलेल्या मोहित उलवाच्या लास्ट बॉलवरच्या बाऊंड्री मध्ये गावस्करांना त्याच्यात कोणाची झलक दिसली?
Mohit Ulva-Sunil Gavaskar
Image Credit source: BCCI, AFP
| Updated on: Nov 16, 2026 | 3:01 PM

अंडर 19 आशिया कपच्या फायनलमध्ये भारताने एका थरारक विजयाची नोंद केली. समोर पाकिस्तानचा संघ होता. चाहत्यांना एका रोमहर्षक क्रिकेट सामन्याची मेजवानी मिळाली. अगदी शेवटच्या चेंडूवर या मॅचचा निकाल लागला. टीम इंडियाच्या शेपटाकडील फलंदाज मोहित उलवाने एका चेंडूत तीन धावांची गरज असताना चौकार मारुन विजय मिळवून दिला. ज्या पद्धतीने हा विजय मिळवला, ते लक्षात घेता क्रिकेट विश्वातून युवा टीम इंडियाचं भरभरुन कौतुक होतय. शेवटच्या आठ ओव्हरमध्ये विजयासाठी 86 धावांचं कठीण टार्गेट होतं. पण मनाल चौहान आणि मोहित उलवा यांनी हे शक्य करुन दाखवलं. मोहित उलवा फायनलमध्ये हिरो ठरला. 10 व्या नंबरवर बॅटिंगला येऊन 26 चेंडूत नाबाद 49 धावा फटकावणारा मोहित विजयाचा नायक ठरला. लास्ट बॉलवर चौकार मारुन मोहित उलवाने मॅच फिनिश केली, या फिनिशिंगची सुनील गावस्कर यांनी एम एस धोनीसोबत तुलना केलीय.

“उलवामध्ये धोनीसारखा शांतपणा दिसून आला. त्याने चौकार मारला आणि पाहिलं, नॉन स्ट्राइकवरचा फलंदाज आनंदात होता. त्याने हेल्मेट काढलं आणि खाली ठेवलं आणि नंतर हात मिळवला” असं सुनील गावस्कर सोनी स्पोर्ट्सवर म्हणाले. मोहित उलवाने पाच चौकार आणि तीन सिक्स मारले. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी तीन धावांची गरज होती. त्याने क्रीझ बाहेर येत थेट चौकार मारला. या चौकाराने भारताच्या अंडर 19 टीमला आशिया कपचं विजेतेपद मिळवून दिलं.

Loading...

तो प्रसंग कायम स्मरणात राहणारा आहे

एम एस धोनीने 2011 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये सिक्स मारुन जेतेपद मिळवून दिलं होतं, गावस्करांनी उलवाच्या चौकाराची त्या विजयाशी तुलना केली. “एम एस धोनी तिथे असता, तर त्याने सुद्धा तेच केलं असतं. वर्ल्ड कप मध्ये सिक्स ठोकल्यानंतर धोनीने त्याची बॅट कशी उचलेली, तुम्हाला माहितीय. तो प्रसंग कायम स्मरणात राहणारा आहे आणि हा सुद्धा” असं गावस्कर यांनी लिहिलय.

पाकिस्तानच्या जबड्यातून विजय खेचून आणला

“महत्वाची गोष्ट म्हणजे हार मानली नाही, आठ विकेट गेले त्यावेळी स्कोर 252 रन्स होता. विजयासाठी 80 पेक्षा जास्त धावांची गरज होती. त्यांनी त्यांचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन तशी वाटचाल केली” असं गावस्कर म्हणाले. मनाल चौहान आणि मोहित उलवाने पाकिस्तानच्या जबड्यातून विजय खेचून आणला.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us