T20 World Cup : सुर्यकुमार यादवच्या त्सुनामीने दिग्गज भांबावले, कमेंटटर्स सुद्धा हैरान

कालच्या मॅचमध्ये चांगली खेळी केल्यानंतर कमेंटटर्स सुद्धा हैराण झाले आहेत

T20 World Cup : सुर्यकुमार यादवच्या त्सुनामीने दिग्गज भांबावले, कमेंटटर्स सुद्धा हैरान
Suryakumar yadav
Image Credit source: BCCI
| Updated on: Nov 07, 2022 | 1:17 PM

मेलबर्न : आशिया चषक (Asia Cup 2022) सुरु झाल्यापासून टीम इंडियाचा स्टार खेळाडू सुर्यकुमार यादव (Suryakumar yadav) चांगली फलंदाजी करीत आहे. त्याची विश्वचषक स्पर्धेतील (T20 World Cup 2022) खेळीपाहून अनेक दिग्गज भांबावले आहेत. कारण सगळ्या मैदानात चौफेर फटकेबाजी होत असल्यामुळे गोलंदाजांनी चेंडू नेमका टाकायचा कुठे असा प्रश्न पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसिम अक्रम याला पडला आहे.

आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत सुर्यकुमार यादवने चांगली खेळी केली आहे. त्याच्याविरुद्ध कशी गोलंदाजी करायची असा प्रश्न अनेक गोलंदाजांना पडला आहे. त्यामुळे सध्याच्या विश्वचषक स्पर्धेत सुर्यकुमार यादवची दहशत आहे असं म्हणायला हरकत नाही.

कालच्या मॅचमध्ये चांगली खेळी केल्यानंतर कमेंटटर्स सुद्धा हैराण झाले आहेत, सुर्या जगातील या जगातील आहे असं वाटतं नाही, कारण तो किती सहजपणे शॉट खेळत आहे अशी कॉमेट्री वसीम अक्रमने केली आहे.

याची फलंदाजी अप्रतिम आहे. त्याच्या समोर गोलंदाजी केल्यानंतर तो तरी काय करेल. तोही भल्याभल्या बॉलच्या गोलंदाजीवर फटका मारतो. विशेष म्हणजे लहान फॉरमॅटमध्ये त्याला रोखणे फार कठीण आहे असं वकार युनूसने कॉमेट्री करताना सांगितले.

हर्षा भोगले याने त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुर्यकुमार यादवची तारिफ केली आहे. मैदानात कुठेही शॉट मारण्यात सुर्यकुमार यादवला सध्या कोणी रोखू शकत नाही.