AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India: एकाच दिवशी टीम इंडिया दोन सामने खेळणार, उद्या टी-20 आणि वनडे सामना रंगणार, कुठे, किती वाजता?

Team India Matches: क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उद्या एकाच दिवशी दोन सामने रंगणार आहेत.

Team India: एकाच दिवशी टीम इंडिया दोन सामने खेळणार, उद्या टी-20 आणि वनडे सामना रंगणार, कुठे, किती वाजता?
| Updated on: Oct 05, 2026 | 12:12 PM
Share

भारतीय क्रिकेट संघाला डिसेंबरपर्यंत बरेच क्रिकेट खेळायचे आहे. टीम इंडियापुढील पुढील आव्हान वेस्ट इंडिजविरुद्ध आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी-२० सामना ६ ऑक्टोबर रोजी लखनौमध्ये खेळला जाईल. मात्र, त्याच दिवशी दुसरा भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. विशेष म्हणजे, दोन्ही भारतीय संघ एकाच वेळी मैदानात उतरतील.

मंगळवार, ६ ऑक्टोबर रोजी भारताचा टी-२० संघ वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला टी-२० सामना खेळणार आहे. सध्या ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघही भारताच्या दौऱ्यावर आहे. भारत ‘अ’ आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका उद्यापासून सुरू होत आहे. हार्दिक पांड्या या मालिकेत पुनरागमन करणार होता, परंतु दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली. त्याच्या जागी सूर्यांश शेडगेला संधी मिळाली आहे.

एकाच वेळी दोन सामने

भारत ‘अ’ आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना पुदुचेरी येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २:०० वाजता सुरू होईल. तर दुसरा सामना भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात रंगणार आहे. पहिला टी२० सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता सुरू होईल. त्यामुळे, एकीकडे लखनौमध्ये सामना रंगेल, तर दुसरीकडे भारताचा दुसरा संघ पुदुचेरीमध्ये मैदानात उतरेल.

भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजवर २-१ असा विजय मिळवला आहे. टी२० मालिकेत त्यांच्यात एकूण पाच सामने खेळले जातील. दरम्यान, भारत ‘अ’ संघाने दोन सामन्यांच्या अनधिकृत कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाला १-० ने पराभूत केले. त्यांची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आता ६ ते ११ ऑक्टोबर दरम्यान खेळवली जाईल.

दोन्ही सामने किती वाजता सुरू होतील?

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला टी२०: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी२० सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता सुरू होईल. हा सामना लखनौ येथील एकाना स्टेडियमवर खेळला जाईल.

भारत ‘अ’ विरुद्ध ऑस्ट्रेलिया ‘अ’ पहिला एकदिवसीय सामना: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २:०० वाजता सुरू होईल. हा सामना पुदुचेरी येथे खेळला जाईल.

भारताचा T20 संघ: श्रेयस अय्यर, वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा, नमन धीर, अभिषेक शर्मा, शिवम दुबे, नीतिश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, ईशान किशन, संजू सैमसन, कुलदीप यादव, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, मयंक यादव

इंडिया अ चा ODI संघ: ऋतुराज गायकवाड, प्रियांश आर्य, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, सूर्यांश शेडगे, निशांत सिंधू, अर्शिन कुलकर्णी, विप्रज निगम, अरशद खान, कुमार कुशाग्र, प्रभसिमरन सिंह, यश ठाकुर, गुरजापनीत सिंह.

Follow Us
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच...
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच दाखवला; रोहित पवारांवर गंभीर आरोप
नवरात्रीचा खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 18 लाख...
इतर खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 11 लाख देण्याचा निर्णय, भाजप नेत्याचा पुढाकार
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी...
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी-गुजराती मुद्द्यावरून वाद
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं...
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं पीक करपलं
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील; नितेश राणेंचं विधान
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील अन्... नितेश राणेंचं मोठं विधान चर्चेत
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल