AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : टीम इंडियाने न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीत धूळ चारली, पहिल्या टी20 मध्ये मैदान मारलं, भारताच्या विजयाचे दोन हिरो

IND vs NZ 1st T20 : भारत आणि न्यूझीलंडमध्ये पाच टी20 सामन्यांची मालिका सुरु झाली आहे. आज पहिल्या टी20 सामन्यात टीम इंडियाने दमदार कामगिरी केली. विजयासाठी अवघड लक्ष्य असूनही भारतीय फलंदाजांनी शक्य करुन दाखवलं.

IND vs NZ : टीम इंडियाने न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीत धूळ चारली, पहिल्या टी20 मध्ये मैदान मारलं, भारताच्या विजयाचे दोन हिरो
Naman Dhir Image Credit source: PTI
| Updated on: Oct 22, 2026 | 5:17 PM
Share

न्यूझीलंड दौऱ्याची भारताने चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या टी20 सामन्यात दमदार विजय मिळवला. भारत आणि न्यूझीलंडमध्ये पाच टी 20 सामन्यांची सीरीज होणार आहे. त्यातला पहिला सामना आज झाला. क्राइस्टचर्चमधील हेगले ओवल येथे हा सामना झाला. भारताने चार विकेटने पहिला टी20 सामना जिंकला. न्यूझीलंडने पहिली बॅटिंग केली. त्यांनी टीम इंडियासमोर विजयासाठी 226 धावांचं अवघड लक्ष्य ठेवलं होतं. पण भारताच्या वाघांनी 2 चेंडू बाकी असताना विजयी लक्ष्य गाठलं. टी20 इंटरनॅशनलमध्ये भारताने पहिल्यांदा इतक्या मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला आहे. भारताचं टी20 इंटरनॅशनल मधील हा यशस्वी रनचेज ठरला. भारताच्या विजयाचे दोन हिरो ठरले. ओपनर संजू सॅमसन आणि नमन धीर. संजूने 68 धावा करुन भारताच्या विजयाचा पाया रचला. नमन धीरने अवघ्या 15 चेंडूत 42 धावा फटकावल्या. यात 5 फोर आणि 2 सिक्स आहेत.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमने युरोप दौऱ्यावर निराशाजनक प्रदर्शन केलय. आयर्लंड आणि इंग्लंडच्या हातून लज्जास्पद पराभव झाला होता. आता न्यूझीलंडचा दौरा सोपा नाहीय. पण सुरुवात चांगली झाली आहे. भारताने रनचेजची तुफान सुरुवात केली. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा दोघांनी 5.5 ओव्हरमध्ये 93 धावांची भागीदारी केली. सॅमसनने 8 चौकार आणि चार सिक्सच्या मदतीने 33 चेंडूत 67 धावा फटकावल्या. अभिषेकने 12 चेंडूत 29 धावांचं योगदान दिलं. यात तीन सिक्स आणि दोन फोर होते. मायकल ब्रेसवेलने अभिषेकला आऊट करुन ही जोडी फोडली. कॅप्टन मिचेल सँटरने सॅमसनला बाद केलं. ब्रेसवेलने मग तिलक वर्माचा विकेट काढला. सँटनरच्या फिरकीच्या जाळ्यात इशान किशनही अडकला.

ते दोघे विजयाच्या उंबरठ्यापर्यंत घेऊन गेले

श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलने पाचव्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी करुन भारताला सामन्यात आणलं. अक्षर पटेलने 24 धावा केल्या. त्याचा विकेट लॉकी फर्ग्यूसनने काढला. मग श्रेयस अय्यरने नमन धीर सोबत मिळून सहाव्या विकेटसाठी 22 चेंडूत 43 धावा जोडल्या. श्रेयस अय्यरच्या 19 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर आऊट झाला. श्रेयसने 2 चौकार आणि एक सिक्स मारला. त्याने 28 चेंडूत 42 धावांचं योगदान दिलं. नमन धीर आणि नितीश रेड्डी दोघांनी भारताला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवलं.

टॉस कोण जिंकलं?

न्यूझीलंडने टॉस गमावला. पहिली बॅटिंग करावी लागली. वेस्ट इंडिज सीरीजप्रमाणे या दौऱ्यातही गोलंदाजी भारताची कमकुवत बाजू ठरली. न्यूझीलंडने 4 विकेट बदल्यात 225 धावांचा डोंगर उभा केला. जसप्रीत बुमराहशिवाय भारतीय गोलंदाजीची वास्तव परिस्थिती उघड झाली.

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ