IND vs NZ: तिलक-नितीशच्या जोडीची क्रेझ थेट पाकिस्तानात, न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचनंतर काय घडलं? पाहा Video
IND vs NZ 2nd T20 Match: भारत न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यातील नितीश कुमार रेड्डी आणि तिलक वर्माच्या खेळीमुळे भारतीय संघाला विजय मिळाला. आता या नंतर पाकिस्त्नात मात्र काय घडलं ते पाहा...

IND vs NZ T20 Match: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात, ७० धावांत ५ गडी गमावल्यानंतर भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले. दोन युवा फलंदाज, तिलक वर्मा आणि नितीश कुमार रेड्डी यांनी शानदार ६९ धावांची भागीदारी करून भारताला सामना जिंकण्यास मदत केली. दोन्ही खेळाडूने भारतीय संघाची जबाबदारी अशावेळी हाती घेतली जेव्हा संघाला खऱ्या अर्थाने गरज होती. तो दोघे इतके चांगले खेळले की थेट पाकिस्तानातून त्यांचे चाहते बनले.
क्राइस्टचर्च येथे खेळल्या गेलेल्या या रोमांचक सामन्यात, भारतीय संघ एका क्षणी ११२ धावांत ६ गडी गमावून मोठ्या संकटात होता. विजयासाठी त्यांना शेवटच्या १८ चेंडूंमध्ये ४८ धावांची नितांत गरज होती. सामना भारताच्या हातून निसटला असे वाटत होते, पण त्यानंतर तिलक वर्माने नितीश कुमार रेड्डीसोबत एक शानदार भागीदारी करून भारताला विजय मिळवून दिला.
View this post on Instagram
तिलकने नाबाद ५१ धावा केल्या, तर नितीश कुमार रेड्डीने २६ धावा केल्या. तिलक आणि नितीश यांनी दबावाखाली आक्रमक फलंदाजी करत, दोन चेंडू शिल्लक असताना टीम इंडियाला एक संस्मरणीय विजय मिळवून दिला. सामना संपताच, पाकिस्तानी क्रिकेट चाहते आणि क्रीडा तज्ञांच्या प्रतिक्रियांनी सोशल मीडिया भरून गेले. अनेक प्रमुख पाकिस्तानी युट्युबर्स आणि माजी क्रिकेटपटूंनीही या दोन तरुण खेळाडूंच्या सामना जिंकून देण्याच्या क्षमतेचे कौतुक केले आहे.
तिलक वर्माच्या सामना जिंकून देणाऱ्या खेळीनंतर, पाकिस्तानी चाहते त्याची तुलना महान फलंदाज विराट कोहलीशी करत आहेत. चाहत्यांचे म्हणणे आहे की, ज्याप्रमाणे विराट कोहली दबावाखाली भारतासाठी सामने जिंकायचा, त्याचप्रमाणे तिलक वर्माची फलंदाजी त्याच्यासारखीच होती. नितीश कुमार रेड्डीचा संयम आणि समजूतदारपणा, कठीण काळात तिलक वर्माला दिलेली साथ आणि सामन्याचे चित्र पालटून टाकणारी भूमिका, या गोष्टींचीही पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर प्रशंसा होत आहे.
अनेक पाकिस्तानी क्रीडा समालोचकांच्या मते, सामना पूर्णपणे न्यूझीलंडच्या बाजूने झुकलेला असताना १८ चेंडूंमध्ये ४६-४८ धावांचा पाठलाग करणे, हे चमत्कारापेक्षा कमी नाही. भारतीय क्रिकेटची ही ‘बेंच स्ट्रेंथ’ आणि युवा खेळाडूंचा निर्भीड खेळ पाहून, पाकिस्तानी चाहते भारतीय क्रिकेट प्रणालीचे कौतुक केल्याशिवाय राहू शकत नाहीत. या दणदणीत विजयामुळे भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत आपले वर्चस्व आणखी मजबूत केले.
