Tokyo Paralympics: भारताची निराशाजनक सुरुवात, टेबल-टेनिसमध्ये अपयश, सोनलबेन आणि भाविना पटेल पराभूत

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये उत्तम यश मिळवल्यानंतर आजपासून भारताचे टोक्यो पॅरालिम्पिक्समधील सामने सुरु झाले आहेत. पण पहिल्या दिवशीच्या सामन्यातच भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Tokyo Paralympics: भारताची निराशाजनक सुरुवात, टेबल-टेनिसमध्ये अपयश, सोनलबेन आणि भाविना पटेल पराभूत
सोनलबेन पटेल
Follow us
| Updated on: Aug 25, 2021 | 10:25 AM

Tokyo Paralympics 2020: टोक्यो ऑलिम्पिक 2020 (Tokyo Olympics 2020) स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत भारतीय खेळाडूंनी सात पदकं मिळवली. त्यानंतर आता टोक्यो पॅरालिम्पिकमध्येही (Tokyo Paralympics 2020)  उत्तम कामगिरी करुन जास्तीत जास्त पदक मिळवण्यासाठी भारतीय पॅरा एथलिट्स सज्ज झाले आहेत. आजपासून भारतीय खेळाडूंच्या स्पर्धांना सुरुवात देखील झाली. पण सलामीच्या सामन्यातच भारताच्या टेबल टेनिसपटू सोनलबेन मनुभाई पटेल आणि भाविनाबेन पटेल यांना पराभवाचा सामना करावा लागला.

सोनलबेन पटेल टेबल टेनिसच्या क्लास थ्री कॅटेगरीमध्ये सहभागी झाली होती. तिचा पहिला सामना चीनच्या लि क्वानविरुद्ध होता. तर दुसरीकडे भाविनाबेन पटेलचा पहिला सामनाही क्लास चार कॅटेगरीमध्ये चीनच्या जु वाईविरुद्ध होता.

सोनलबेनची झुंज अपयशी

सोनलबेनने सामन्या सुरुवातीला चांगली आघाडी मिळवली होती. पहिल्या तीन गेमनंतर ती सामन्यात आघाडीवर होती. पण त्यानंतर ती सामन्यात मागे पडू लागली आपली लीड कायम ठेवता न आल्याने अखेर तिला हा रोमहर्षक सामना 3-2 च्या फरकाने गमवावा लागला. पाच गेम चाललेल्या सामन्यात चीनच्या खेळाडूने 11-9,3-11,15-17,11-7,11-4 च्या फरकाने विजय मिळवला.

भाविनाही पहिल्या सामन्यात पराभूत

सोनलबेन प्रमाणे भाविनाबेन देखील आपल्या पहिल्या सामन्यात चीनच्या प्रतिस्पर्धी खेळाडूकडून पराभूत झाली. ती सामन्यात सुरुवातीपासूनच पिछाडीवर होती. त्यामुळे तिला 11-3,11-9,11-2 अशा सरळ तीन सेट्समध्ये पराभव पत्करत सामना गमवावा लागला. त्यामुळे भारताचा पॅरालिम्पिकमधील पहिला दिवस निराशाजनक ठरला.

इतर बातम्या

Tokyo Paralympics 2020: पॅरालिम्पिक्समध्येही यश मिळवण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज, वाचा संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

Tokyo Paralympics: पंतप्रधान मोदींनी पॅरालिम्पिक्ससाठी रवाना होणाऱ्या खेळाडूंशी साधला संवाद, 24 ऑगस्टपासून स्पर्धेला सुरुवात

(First day at tokyo paralympics indias table tennis player sonalben patel and bhavina patel lost their first matches)

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.