पैलवान बजरंग पुनियाने सांगितला ऑलिम्पिकमधील किस्सा, मोदींनी थोपटली पाठ, पाहा VIDEO

भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ऑलिम्पिकमधील सर्व सहभागी खेळाडूंना लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण कार्यक्रमासाठी आमंत्रित करत त्यांचे अभिनंदन केले.

पैलवान बजरंग पुनियाने सांगितला ऑलिम्पिकमधील किस्सा, मोदींनी थोपटली पाठ, पाहा VIDEO
बजरंग पुनिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (सौजन्य - ANI)
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 12:27 PM

नवी दिल्ली :  भारतीय खेळाडूंनी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) केलेल्या ऐतिहासिक कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मागील काही दिवस सर्व सोशल मीडिया खेळाडूंच्या फोटोजनी न्हावून निघाला आहे. याच खेळाडूंच्या कामगिरीचे अभिनंदन करण्याकरता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ऑलिम्पिकमधील सर्व सहभागी खेळाडूंना लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण कार्यक्रमासाठी आमंत्रित केले. यावेळी त्यांनी खेळाडूंशी गप्पा मारत त्यांची विचारपूस केली, तसेच ऑलिम्पिकमधील गप्पा गोष्टी केल्या. यावेळी पैलवान बजरंग पुनियाने त्याचा ऑलिम्पिकमधील एक किस्सा सांगताच सर्व प्रेक्षकांनी अक्षरश: टाळ्यांचा कडकडाट केला. मोदीजींनी देखील बजरंगची पाठ थोपटली.

ऑलिम्पिक खेळांदरम्यान बजरंगच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्याचा परिणाम त्याच्या सरावावर देखील होत होता. त्यामुळे ऑलिम्पिकमधील डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. याबाबत बोलताना मोदीजींनी त्याला तू अखेरच्या क्षणी पट्टी वैगेरे काढून खेळण्याचा धाडसी निर्णय कसा घेतलास? असा प्रश्न विचारला. ज्यावर उत्तर देताना बजरंग म्हणाला, ”मला त्याठिकाणी विश्रांती करण्याचा सल्ला दिला होता. पण तिथे देशासाठी पदक मिळवायला गेलो होतो. त्यामुळे माझा पाय तुटला असता तरी मला पर्वा नव्हती. देशासाठी पदक महत्त्वाचं होतं.” बजरंगच्या या वाक्यानंतर सर्व प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि मोदीजींनी देखील बजरंगची पाठ थोपटत त्याला शाबासकी दिली.

असं मिळवलं कांस्य पदक

भारताचा पैलवान बजरंग पुनियाने कझाकिस्तानच्या नियाझबेकोला नमवत कांस्य पदक मिळवलं होतं.  65 किलो वजनी गटात कांस्यपदकाची लढाई सुरु असताना पुनियाने सुरुवातीपासून आघाडी कायम ठेवली होती. अखेर बजरंगने मॅच 8-0 अशी जिंकत भारताला कांस्य पदक मिळवून दिले.

संबंधित बातम्या :

रौप्य पदक जिंकल्यानंतरही पैलवान रवीवर मोदीजी नाराज, तक्रार करत म्हणाले…

Tokyo Olympic 2021 : पैलवान रवी दहियाची धडाकेबाज कामगिरी, कुस्तीत रौप्य पदकाची कमाई

भारताला टोकियो ऑलम्पिकमध्ये दुसरं रौप्य, रवीकुमार दहियानं इतिहास रचला, नरेंद्र मोदींकडून ट्विट करत अभिनंदन

(wrestler bajrang punia tells tokyo olympics incident narendra modiji praises him)

Non Stop LIVE Update
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.