लग्नाच्या काही दिवसांतच काव्या मारनला मोठा धक्का, त्याच्या एका निर्णयानं सगळच बदलणार
SRH IPL 2027: आयपीएल २०२७ पूर्वी आता काव्या मारनला मोठा धक्का बसला आहे. रिटेशनमध्ये असं काय घडणार आहे की काव्या मारनला पचवणं अवघड जाणार आहे.

IPL Retention 2027: नुकतेच सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारन आणि गायक अनिरुद्ध रविचंदर यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. ग्रीसमधील या विवाहसोहळ्याचे अनेक फोटो सोशलल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. या दोघांनी पारंपारिक पद्धतीने लग्न न करता त्यांनी सेल्फ रिसपेक्ट मॅरेज या पद्धतीला प्राधान्य दिले. आता लग्नाच्या काही दिवसांतच काव्याला मोठा झटका बसला आहे.
आयपीएल २०२७ साठी कायम ठेवलेल्या आणि मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर होण्यापूर्वीच, ट्रॅव्हिस हेडबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. ट्रॅव्हिस हेड आयपीएल २०२७ मधून बाहेर पडला आहे, म्हणजेच तो पुढच्या हंगामात खेळताना दिसणार नाही. जर असे झाले नाही, तर चाहत्यांना ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांची आयपीएलमधील सर्वात स्फोटक सलामीची जोडीही मुकणार आहे. इतक्या चांगला खेळाडूने संघाची साथ अचानक सोडल्याने मालकीण काव्या मारनला मोठा झटकाच बसला असणार.
ट्रॅव्हिस हेडच्या आयपीएल २०२७ मधील अनुपस्थितीचे कारण त्याच्यावरील कामाचा ताण आणि आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्यांशी संबंधित आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, हेडने सनरायझर्स हैदराबादला आपल्या निर्णयाबद्दल कळवले आहे. हेडच्या अनुपस्थितीमुळे केवळ एसआरएचच्या फलंदाजीच्या फळीच रिकामी झाली नाही, तर गोव्यात १६ डिसेंबर रोजी होणाऱ्या मिनी लिलावापूर्वी फ्रँचायझीच्या तिजोरीतही लक्षणीय वाढ होईल. ट्रॅव्हिस हेड हा फ्रँचायझीने कायम ठेवलेल्या पाच आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या खेळाडूंपैकी एक होता. फ्रँचायझीने त्याला १४ कोटी रुपयांना विकत घेतले होते.
पुढील वर्षी आयपीएलनंतर होणाऱ्या डब्ल्यूटीसी (WTC) फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया खेळण्याची शक्यता आहे. त्यानंतर ॲशेस आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धाही आहेत. या सर्व मोठ्या मालिका आणि स्पर्धा पाहता, ट्रॅव्हिस हेड याचा निर्णय आश्चर्यकारक नाही. देशाला प्रथम प्राधन्य दिल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. त्याने आपल्या देशासाठी तब्बल १४ कोटी इतक्या मोठ्या रकमेवर सहज पाणी सोडले आहे. आज आयपीएल रिटेशनचा शेवटचा दिवस आहे. आज सर्व चाहत्यांचे लक्ष हे प्रत्यके संघाच्या भूमिकेकडे असणार आहे.