
मुंबई – आयपीएल 2022 चे 60 सामने आत्तापर्यंत खेळले गेले आहेत, परंतु आयपीएलच्या (IPL 2022) सुरुवातीपासून राजस्थान रॉयल्सच्या जॉस बटलरचे (Jos Buttler) ऑरेंज कॅप (Orange Cap) शर्यतीत वर्चस्व कायम आहे. तसेच पर्पल कॅपवर लेगस्पिनर युजवेंद्र चहलनेही बराच काळ कब्जा केला होता. परंतु पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यानंतर अखेर वानिंदू हसरंगाने ही कॅप आपल्या नावावर केली आहे. हसरंगा आणि चहल यांच्या नावावर या मोसमात 23-23 विकेट्स आहेत. दोघांनी आत्तापर्यंत समान विकेट घेतल्याने पुढच्या सामन्यात यांच्यात रेस पाहायला मिळणार आहे. आत्तापर्यंत झालेल्या सामन्यात दोन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे.
कोण कितव्या स्थानी?
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत हे खेळाडू सामील
आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत जॉस बटलर 625 धावांसह अव्वल स्थानावर आहे. तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्यानंतर शिखर धवन आणि फाफ डू प्लेसिस टॉप 5 मध्ये प्रवेश केला आहे. तर 70 धावांची तुफानी इनिंग खेळणाऱ्या लियाम लिव्हिंगस्टोनने टॉप 10 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. या यादीत केएल राहुल आणि डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
पर्पल कॅप हसरंगाकडे…
पंजाब किंग्जविरुद्ध 4 षटकांच्या कोट्यात 15 धावांत दोन बळी घेणार्या आरसीबीच्या वानिंदू हसरंगाने युझवेंद्र चहलकडून पर्पल कॅप हिसकावली आहे. हसरंगा आणि चहल यांनी या हंगामात 23-23 विकेट घेतल्या आहेत, परंतु चांगल्या ईकोनॉमीमुळे ही कॅप आरसीबीच्या गोलंदाजाच्या पारड्यात पडली आहे.
दुसरीकडे, पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आरसीबीविरुद्ध तीन विकेट घेत 21 विकेट्ससह या दोन गोलंदाजांच्या यादीत आहे. हर्षल पटेलनेही 18 विकेट घेत टॉप 4 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.