IPL 2022 Purple cap: बँगलोरचा गोलंदाज Yuzvendra chahal वर पडला भारी, हिसकावली पर्पल कॅप

यंदाच्या IPL 2022 मध्ये युजवेंद्र चहल (Yuzvendra chahal) जबरदस्त गोलंदाजी करतोय. संघाला गरज असताना, तो विकेट मिळवून देतोय. त्यामुळे आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट काढणाऱ्या गोलंदाजाला दिली जाणारी पर्पल कॅप त्याच्याकडे होती.

IPL 2022 Purple cap: बँगलोरचा गोलंदाज Yuzvendra chahal वर पडला भारी, हिसकावली पर्पल कॅप
यजवेंद्र चहल विकेट घेणाऱ्यां यादीत अव्वलImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 12:25 PM

मुंबई: यंदाच्या IPL 2022 मध्ये युजवेंद्र चहल (Yuzvendra chahal) जबरदस्त गोलंदाजी करतोय. संघाला गरज असताना, तो विकेट मिळवून देतोय. त्यामुळे आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट काढणाऱ्या गोलंदाजाला दिली जाणारी पर्पल कॅप त्याच्याकडे होती. पर्पल कॅप जणू युजवेंद्र चहलची ओळख बनली होती. राजस्थान रॉयल्सचा सामना सुरु झाली की, ही कॅप चहलच्या डोक्यावर दिसायची. पण आता ही कॅप त्याच्याकडे राहिलेली नाही. ही कॅप आता रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा फिरकी गोलंदा वानिंदु हसरंगाच्या (Wanindu Hasaranga) डोक्याची शोभा वाढवत आहे. आपल्या कामगिरीच्या बळावर श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजाने युजवेंद्र चहलकडून ही कॅप हिसकावून घेतली आहे. पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात वानिंदु हसरंगाने चार ओव्हर्समध्ये दोन विकेट घेतल्या. भानुका राजपक्षे आणि जितेश शर्मा या दोन विकेट हसरंगाला मिळाल्या. या दोन विकेटमुळेच चहलकडे असलेली पर्पल कॅप हसरंगाला मिळाली.

दोघांचे समान विकेट, चहल तर हसरंगापेक्षा एक मॅच कमी खेळला

हसरंगाचे 13 सामन्यात 23 विकेट आहेत. तेच चहलने 12 सामन्यात 23 विकेट घेतलेत. आता तुम्ही म्हणाल, दोघांचे समान विकेट आहेत. चहल हसरंगापेक्षा एक मॅच कमी खेळलाय, तरी मग कॅप हसरंगाकडे कशी?. याचं उत्तर आहे, हसरंगाची गोलंदाजीची सरासरी आणि शानदार इकॉनमी. हसरंगाने 14.65 च्या सरासरीने 7.48 च्या इकॉनमीने 13 सामन्यात 23 विकेट घेतल्यात. त्याचवेळी 12 सामन्यात 23 विकेट घेणाऱ्या चहलची गोलंदाजीची सरासरी 15.73 आणि इकॉनमी 7.54 आहे. इकॉनमी आणि सरासरी यामध्ये हसरंगा सरस आहे. त्यामुळे पर्पल कॅप त्याच्याकडे आहे.

हसरंगा कधीपर्यंत संभाळू शकतो पर्पल कॅप?

हसरंगा जास्त दिवस पर्पल कॅप आपल्याकडे ठेऊ शकतो का? तर त्याचं उत्तर नाही आहे. कारण चहलने त्याच्यापेक्षा एक सामना कमी खेळलाय. त्याशिवाय राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे चहलकडे हिसकावलेली टोपी परत मिळवण्याची एक चांगली संधी आहे.

हे सुद्धा वाचा

रबाडा पण पर्पल कॅपच्या शर्यतीत

पर्पल कॅपच्या शर्यतीत दोन लेग स्पिन्र तर एक वेगवान गोलंदाज आहे. पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाच्या खात्यात 11 सामन्यात 21 विकेट आहेत. त्यामुळे एखाद्या सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली, तर तो सुद्धा पर्पल कॅपचा दावेदार बनू शकतो.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.