AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानमध्ये हाहाकार! शाळा बंद, 25 टक्के पगारात कपात, मोठी खळबळ, थेट अमेरिका इराण युद्धाचा…

अमेरिका आणि इराण युद्धाचा मोठा फटका जगातील अनेक देशांना बसत आहे. यादरम्यानच एक खळबळ उडवणारी बातमी पुढे येत आहे. गॅस आणि तेलाची मोठी समस्या पाकिस्तानमध्ये झाली असून सरकारने हैराण करणारा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानमध्ये हाहाकार! शाळा बंद, 25 टक्के पगारात कपात, मोठी खळबळ, थेट अमेरिका इराण युद्धाचा...
Pakistan government
| Updated on: Mar 10, 2026 | 9:47 AM
Share

इराण आणि अमेरिका यांच्या युद्धाचा फटका थेट दुसऱ्या देशांना बसत आहे. मोठ संकट निर्माण झालं. हे युद्ध अजून काही दिवस चालेल. मात्र, जगातील अनेक देश संकटात आली आहेत. जगातील अनेक देशांवर तेलाचे आणि गॅसचे संकट आहे. तेलाची मोठी टंचाई निर्माण झाली. आखाती देशांमधून मोठ्या संख्येने जगात तेल पुरवठा होतो. मात्र, इराण अमेरिका युद्धाचा थेट परिणाम तेल निर्यातीवर झाला असून जवळपास तेलाची निर्यात बंद आहे. इराणने आखाती देशामधील तेल रिफायनरीवर हल्ला केला. इराणच्या तेल डेपोंना मोठी आग लागली. परिणामी तेलाची रिफायनरीच बंद झाली. जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किंमती अस्थिर झाल्या आहेत. तेलाच्या किंमती कधी उतरणार हे अमेरिका सांगूच शकत नसल्याचे इराणने म्हटले. तेलाच्या वाढलेल्या किंमती आणि थांबलेली निर्यात यामुळे अनेक देशात परिस्थिती गंभीर आहे.

या युद्धामुळे पाकिस्तानमध्ये मोठा हाहाकार बघायला मिळतोय. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देशाच्या तेलाचे संवर्धन करण्यासाठी अनेक कठोर उपाययोजनांची घोषणा केली. हेच नाही तर पाकिस्तानमध्ये तेलाचा इतका जास्त तुटवडा आहे की, त्यांनी धक्कादायक निर्णय घेत शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. पाकिस्तानमध्ये अजिबात तेल शिल्लक नाहीये. पुढील 2 आठवड्यांकरिता शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली.

यासोबतच कर्मचाऱ्यांचे पगार 25 टक्के कापले जाणार आहेत. तेल आणि वायूसाठी पाकिस्तान आखाती देशांवर अवलंबून आहे. पाकिस्तानमध्ये तेलाची आणि गॅसची अजिबात आयात होत नाहीये. सरकारकडून पेट्रोलच्या किंमती जवळपास 20 टक्क्यांनी वाढवल्या. पाकिस्तानच्या सरकारने आता शाळा दोन आठवड्यांसाठी बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला.

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या निर्णयाला कठीण म्हटले आहे. पुढील किंमती टाळण्याकरिता या उपायोजना करत असल्याचे त्यांनी म्हटले. ऊर्जा संकट आता एक नवीन संकट बनले असल्याचेही त्यांनी म्हटले. यासोबतच काही ऑफिसला वर्क फ्रॉम होम देखील जाहीर करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारकडून घेण्यात आला. पाकिस्तानमध्ये परिस्थिती अधिक बिकड बनता दिसत आहे. तेलाचा साठा पाकिस्तानचा जवळपास संपला असल्याचेही सांगितले जात आहे.

Follow Us
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप
शरद पवारांचं थेट पंतप्रधान मोदींना बारामतीचं निमंत्रण; चर्चांना उधाण
मोठी राजकीय घडामोड! शरद पवारांचं थेट पंतप्रधान मोदींना बारामतीचं निमंत्रण; चर्चांना उधाण
धो धो धो पावसात चक्क शाळाच... दोरीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचा बचाव
Video | धो धो धो पावसात चक्क शाळाच... दोरीच्या सहाय्याने चिमुकल्यांचा रेस्क्यु, धडकी भरवणारा व्हिडीओ समोर