Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीकडे किती गाड्या, सर्वात महागड्या कारची किंमत किती?
Vaibhav Sooryavanshi Car Collection : वैभवने क्रिकेटच्या जगतात त्याचा डंका वाजवला आहे. त्याच्या खेळावर प्रभावित होऊन आता त्याच्या संपत्तीमध्येही वाढ होत आहे. पण आता त्याच्याकडील कारचे कलेक्शन समोर आले आहे.

वैभव सूर्यवंशी हा भारताचा नवा सुपरस्टार आहे. टीम इंडियाचा हा चमकदार स्टार स्वतःच्या नावावर अनेक विक्रम तयार करतोय. त्यामुळे आता त्याच्या मार्केट व्हॅल्यूमध्येही मोठी वाढ होताना दिसत आहे. वैभवकडे आता गाड्यांचा ताफाहाी पाहायला मिळतोय. अनेक गाड्या त्याच्याकडे दिसून येत आहेत. फक्त कारच नाही तर अनेक बाईक्सही त्याच्याकडे आहेत. वैभवकडील वाहनांचे फोटो समोर आले आहेत. त्याच्या भावाने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.
वैभव हा फक्त 15 वर्षांचा आहे. तो समस्तीपूरमधील ताजपूर या गावातला आहे. पण असं असतानाही त्याच्याकडील गाड्यांच्या रांगाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. विश्वकर्मा पूजेच्या निमित्ताने वैभवचा मोठा भाऊ उज्वल याने त्यांच्याकडील सर्व वाहनांची पूजा केली. गॅरेजबाहेर काढलेल्या वाहनांना रांगेत उभ करुन त्याने फोटो काढले आणि त्यानंतर ते इन्टावर पोस्ट केले.
पण आता प्रश्न असा आहे की, एवढ्या सगळ्या गाड्यांमध्ये सर्वात महागडी गाडी कोणती? दरम्यान, वैभवकडे महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक आणि टोयोटा फॉर्च्युनर या गाड्या आहेत अर्थातच, या सर्वात महागडी गाडी टोयोटा फॉर्च्युनर आहे, जिची किंमत 35 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, वैभव हा अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेच्या टीम इंडियाच्या स्क्वाडचा हिस्सा आहे. परंतू त्याला आधीच्या दोन सामन्यांच्या अंतिम अकरा खेळाडूंमध्ये खेळायची संधी मिळालेली नाही. आज टीम इंडिया तिसऱ्या सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. टीमने यापूर्वीच अफगाणिला दोन्ही सामन्यांमध्ये पराभूत केलेलं आहे. त्यामुळे या मालिकेवर टीम इंडियाने नाव कोरलंं आहेच. पण आजतरी वैभवला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार का नाही, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. कारण वैभवला संधी मिळाली तर त्याचा घरच्या मैदानावरील हा पहिला आंतरराष्ट्रीय सामनाल होणार आहे. दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्धचा आजचा अखेरचा सामना संध्याकाळी 7.30 वाजता दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तर सामन्याचा टॉस 7 वाजता होणार आहे.