AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi: बीसीसीआयच्या एका अटीमुळे इतकं छान खेळूनही वैभवला संघात स्थान नाही, असं का?

वैभव सूर्यवंशीकडे इतकी प्रतिभा असूनही त्याला भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. आता वैभवला स्थान का मिळाले नाही यामागचे कारणही समोर आले आहे.

Vaibhav Sooryavanshi: बीसीसीआयच्या एका अटीमुळे इतकं छान खेळूनही वैभवला संघात स्थान नाही, असं का?
| Updated on: Aug 28, 2026 | 11:26 AM
Share

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशी हा भारताचा उदयोन्मुख क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याने नुकतेच इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत भारतासाठी एकूण सहा टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. असे असूनही, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी १९ वर्षांखालील मालिकेसाठी त्याची निवड झालेली नाही, तर दुसरीकडे वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर आणि राहुल द्रविडचा मुलगा अन्वय यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. केवळ १५ वर्षांच्या वैभवचा १९ वर्षांखालील संघात समावेश का करण्यात आला नाही. वैभवच्या निवडीमागे बीसीसीआयचा एक कठोर नियम आहे.

बीसीसीआयने २०१६ मध्ये एक नियम लागू केला होता. त्या नियमानुसार, एक खेळाडू आपल्या आयुष्यात फक्त एकदाच १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत खेळू शकतो. याचा अर्थ असा की, जर एखादा खेळाडू वयाच्या १५ किंवा १७ व्या वर्षी अंडर-१९ विश्वचषकात खेळला असेल, तर तो १९ वर्षांचा होण्यापूर्वी पुन्हा विश्वचषक झाल्यास, वयाने पात्र असूनही त्याची संघात निवड होणार नाही. या नियमामुळे वॉशिंग्टन सुंदरला २०१८ च्या अंडर-१९ विश्वचषकात खेळता आले नाही.

वैभव सूर्यवंशी २०२६ च्या अंडर-१९ विश्वचषकात आधीच खेळला आहे आणि बीसीसीआयच्या नियमांमुळे तो पुन्हा खेळू शकत नाही. यामुळेच निवड समितीने इतर नवीन खेळाडूंना संधी देण्यासाठी त्याला यावेळी अंडर-१९ संघात स्थान दिले नाही. ऑस्ट्रेलियाचा अंडर-१९ संघ १८ सप्टेंबरपासून भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघ १८, २१ आणि २३ सप्टेंबर रोजी राजकोटमध्ये तीन एकदिवसीय सामने खेळतील. यानंतर दोन मल्टी डे सामने खेळले जातील: पहिला राजकोटमध्ये २७ ते ३० सप्टेंबर दरम्यान, आणि दुसरा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या ‘बी’ मैदानावर ५ ते ८ ऑक्टोबर दरम्यान.

लेग-स्पिन अष्टपैलू आर्यवीर सेहवाग आणि यष्टीरक्षक-फलंदाज अन्वय द्रविड यांची १५ सदस्यीय एकदिवसीय संघात निवड झाली होती, परंतु दोघांपैकी कोणालाही दोन मल्टी डे सामन्यांमध्ये स्थान मिळाले नाही. आर्यवीर सध्या २०२६ च्या दिल्ली प्रीमियर लीग (डीपीएल) मध्ये वेस्ट दिल्ली लायन्स संघाकडून खेळत असून, त्याने आतापर्यंत फक्त दोन सामने खेळले आहेत. आर्यवीरची १९ वर्षांखालील एकदिवसीय संघात निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे, तर अन्वय यापूर्वी या संघाचा भाग होता.

Follow Us
हिरव्या निसर्गाच्या सान्निध्यात मुंबई-गोवा हायवेचं विलोभनीय सौंदर्य,
हिरव्या निसर्गाच्या सान्निध्यात मुंबई-गोवा हायवेचं विलोभनीय सौंदर्य, पाहा मनमोहक दृश्य
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात श्रीकांत शिंदे ॲक्टिव्ह मोडवर; 12 तासांतच
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे ॲक्टिव्ह मोडवर;12 तासांतच...
एमपीएससी पेपरफुटी: ऋतुजा पाटीलची प्रश्नपत्रिकेसाठी ५ लाखांची मागणी
एमपीएससी पेपरफुटी: ऋतुजा पाटीलची प्रश्नपत्रिकेसाठी ५ लाखांची मागणी
मुंबईत दुधाच्या दरात 1 सप्टेंबरपासून 9 रुपयांची वाढ
मुंबईत दुधाच्या दरात 1 सप्टेंबरपासून 9 रुपयांची वाढ
नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील महिला पर्यटकांशी शिंदेंचा संवाद
नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील महिला पर्यटकांशी उपमुख्यमंत्री शिंदेंचा व्हिडीओ कॉल
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा