हार मानेल तो बजरंग पुनिया कसला? डोक्यातून भळाभळा रक्त वाहत होतं, पण पठ्ठयाने…पहा VIDEO

जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप 2022 स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूना फार मोठं यश मिळालेलं नाही. त्यांना कडव्या संघर्षाचा सामना करावा लागतोय. विजय हातून निसटतोय.

हार मानेल तो बजरंग पुनिया कसला? डोक्यातून भळाभळा रक्त वाहत होतं, पण पठ्ठयाने...पहा VIDEO
bajrang puniaImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Sep 17, 2022 | 7:00 PM

मुंबई: जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप 2022 स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूना फार मोठं यश मिळालेलं नाही. त्यांना कडव्या संघर्षाचा सामना करावा लागतोय. विजय हातून निसटतोय. पण या सगळ्यात भारताचा अव्वल कुस्तीपटू बजरंग पुनियाने आपला लढाऊ बाणा दाखवून दिला. त्याने आपली झुंजार वृत्ती दाखवताना हिम्मत सोडली नाही.

सामना जिंकून दाखवला

अनेकांना त्याच्या या गुणांच आश्चर्य वाटलं, अभिना वाटला. बजरंगने विश्व चॅम्पियनशिपमध्ये आपल्या दुखापतीची पर्वा केली नाही. प्रतिस्पर्ध्यासमोर हार मानली नाही. सामना जिंकून दाखवला.

बजरंगची दमदार सुरुवात

सर्बियाच्या बेलग्रेडमध्ये ही चॅम्पियनशिप सुरु आहे. शनिवारी 17 सप्टेंबरला पुरुषांचा फ्रिस्टाइल इवेंट होता. 65 किलो वजनीगटात बजरंग भारताकडून उतरला होता. 2018 मध्ये या कॅटेगरीत सिल्वर आणि 2019 मध्ये ब्राँझ मेडल त्याने जिंकलं होतं. यावेळी त्याच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती. बजरंगने दणक्यात सुरुवात केली. त्याने क्यूबाच्या एलेहांद्रो एनरिकेला वाल्देसला हरवून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला.

बाऊट सोडण्याचा ऑप्शन होता

बजरंगसाठी या बाऊटमध्ये विजय मिळवणं सोप नव्हतं. सामना सुरु असताना त्याच्या डोक्याला मार लागला. डोक्यातून भळाभळा रक्त वाहू लागलं. त्यामुळे सामना मध्येच थांबवावा लागला. बजरंगजवळ बाऊट सोडण्याचा ऑप्शन होता.

किती पॉइंटसने विजय मिळवला?

पण भारतीय कुस्तीपटूने हार मानली नाही. बजरंगने डोक्याला पट्टी बांधली व पुन्हा मॅटवर उतरला. बजरंगने वाल्देसला 5-4 असं हरवून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला.

….तर ब्राँझसाठी खेळण्याची संधी मिळेल

बजंरगने क्यूबाच्या कुस्तीपटू विरुद्ध सामना जिंकला. पण दुखापतीचा प्रभाव पुढच्या लढतीत जाणवला. क्वार्टर फायनलमध्ये बजरंग पूर्ण क्षमतेने लढू शकला नाही. अमेरिकेच्या डियाकोमिहालीसने त्याला 10-0 स्कोरच्या आधारावर हरवलं. अमेरिकी कुस्तीपटू फायनलमध्ये पोहोचल्यास बजरंगला रेपेचाजमधून ब्राँझसाठी खेळण्याची संधी मिळेल.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.