Vinod Kambli: कोट्यवधींची संपत्ती, तरी वृद्धाश्रमाचा आसरा? विनोद कांबळीच्या वांद्रे घराची किंमत ऐकून व्हाल थक्क!
वृद्धाश्रमात राहत असलेले विनोद कांबळी यांच्या नावावर आहे कोट्यवधी संपत्ती, आता त्यांची प्रॉपर्टी नेमकी कुठे आहे आणि ते मुंबईत कुठे राहतात जाणून घ्या...

Vinod Kambli Property: विनोद कांबळी यांचा दोन ते तीन दिवसांपूर्वा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ते वृद्धाश्रमात बसलेले पाहायला मिळाले. इतक्या महान फलंदाजावर अशी वेळ आल्याने सर्वच शॉक झाले. ते आधीच गंभीर आजाराशी झगडत होते, त्यात आता ते थेट वृद्धाश्रमात दिसल्यामुळे चाहते खूपच भावूक झाले. पण वृद्धाश्रमात दाखल झालेल्या विनोद कांबळीकडे प्रॉपर्टी आहे की नाही असा प्रश्न सर्वांनाच पडतो.
विनोद कांबळी यांचे मुंबईत ८ कोटी रुपयांचे घर आहे. वांद्रे येथील प्रतिष्ठित ज्वेल टॉवरमध्ये त्यांचे कोट्यवधींचे घर आहेत. त्यांचे हे घर अजिंक्य रहाणे आणि अजित आगरकर यांच्या घराच्या शेजारीचं असल्याचे म्हटले जाते. या अपार्टमेंटमध्ये एक प्रशस्त ३-बीएचके लिव्हिंग एरिया आहे. तपकिरी रंगाचे पडदे आणि त्याला जुळणाऱ्या लेदरच्या सोफे आहेत. भिंतीवर वेगवेगळ्या फोटो फ्रेम पाहायला मिळत आहेत. ज्यात एका फोटोने विशेष लक्षवेधून घेतले आहे. यातील एक फोटो हा जीवलग मित्र सचिन तेंडुलकरांसोबतचा आहे.
घरात ओपन-प्लॅन किचनची आहे. तसेच घरात धार्मिक वातावरणही पाहायला मिळत आहे. २०१२ मध्ये विनोद कांबळी यांनी ख्रिश्चन धर्म स्विकारला असल्याने त्यांच्या घरात ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. घरातील एक विशेष पोर्ट्रेट लिव्हिंग रूम आर्कषण बनले आहे.
विनोद कांबळी यांच्या आयुष्यात अनेक चढ उतार आलेत. अनेक संघर्षांचा त्यांना सामना करावा लागला, विनोद कांबळी यांना मधल्या काळात धड चालताही येत नव्हतं, इतकी अवस्था गंभीर झाली होती की त्यांना बोलताना त्रास होत होता. त्यांच्यावर मागील काही काळापासून उपचार सुरुच आहे, आता ते कधी बरे होतात याची आतुरता चाहत्यांना पण लागलेली आहे, जेव्हा आयपीएल सुरु होती तेव्हा ते मुंबई इंडियन्सचा सामना पाहण्यासाठी ही वानखेडेमध्ये पोहोचले होते. त्यांना वानखेडेत पाहून चाहत्यांना भलताच आनंद झाला होता, यामुळे विनोद कांबळी लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना चाहते करत आहेत.
