AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinod Kambli Wife: निर्लज्जपणाचा कळस! विनोद कांबळीच्या बिकट अवस्थेवर पत्नीने उडवली खिल्ली, थेट त्याच्या…

Vinod Kambli Wife Andrea Hewitt Statement: विनोद कांबळी यांचा एक व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता, आता या व्हिडिओवर त्यांची पत्नीने त्यांची प्रतिक्रिया दिली असून ती प्रचंड संतापली आहे.

Vinod Kambli Wife: निर्लज्जपणाचा कळस! विनोद कांबळीच्या बिकट अवस्थेवर पत्नीने उडवली खिल्ली, थेट त्याच्या...
| Updated on: Sep 28, 2026 | 10:52 AM
Share
Vinod Kambli Wife Andrea Hewitt Statement: टीम इंडियाचा माजी धुरंधर खेळाडू विनोद कांबळी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहेत.  दोन दिवसांपूर्वी आजारपणाशी झुंज देत असलेल्या विनोद कांबळी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये कांबळी ठाण्यातील ‘निदान सेंटर फॉर एल्डर्ली केअर’ या वृद्धाश्रमात असल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विनोद कांबळी वृद्धाश्रमात काय करतोय? तर त्यांची पत्नी कुठे आहे? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्यानंतर आता विनोद कांबळीच्या पत्नीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
विनोद कांबळीच्या पत्नीचा मोठा खुलासा व्हायरल व्हिडिओमध्ये विनोद कांबळी अडखळत बोलताना दिसला. व्हिडिओमध्ये कांबळी असे म्हणाले की, “माझ्यावर सध्या उपचार सुरू असून येथील सोयी-सुविधा अत्यंत सोयीस्कर आहेत. येथे राहताना मला घरापासून दूर असल्याचे अजिबात वाटले नाही” यानंतर कांबळी हसले. आता कांबळी सध्या घरी आहेत, या व्हिडिओनंतर माजी अंपायर आणि कांबळी यांचे जुने मित्र मार्कस कुटो यांनी त्यांच्या वांद्रे येथी घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी कांबळी यांच्या पत्नींनी यामागचे सत्य सांगितले.
कुटो यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद कांबळी यांची प्रकृती सध्या स्थिर असून ते आता स्वत: नाश्ता करत आहे, आणि आता ते आधीपेक्षा अधिक सक्षम दिसत आहेत. तसेच त्यांची स्मरणशक्तीही आधीसारखीच चांगली आहे. त्यामुळे काळजी करण्यासारखे काही कारण नाही. यावेळी त्यांनी विनोद कांबळी ओल्ड एज होममध्ये का गेला यामागचे कारणही सांगितले.
रुग्णालयातील असे व्हिडिओ आणि रील्स व्हायरल झाल्यामुळे कांबळी यांची पत्नी अँड्रिया हेविट आणि दोन्ही मुले नाराज झाले आहेत, असं कुटो यांनी सांगितले आहे. अँड्रिया यांची प्रकृतीही सध्या ठीक नसल्यामुळे रुग्णालयाचे कर्मचारी वेळोवेळी कांबळी यांची काळजी घेण्यासाठी आणि उपचारांसाठी मदत करत होते. कधीकधी अँड्रिया यांना कांबळी आणि त्यांच्या दोन मुलांची एकत्र देखभाल करणे कठीण जाते. अँड्रिया यांचीही प्रकृती काही विशेष बरी नाही. त्यामुळे त्या मदतीसाठी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना बोलावत असतात आणि त्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना घरून केंद्रावर नेतात  त्यांची काळजी घेतात आणि त्यांना पुन्हा घरी परत आणून सोडतात, असं कुटो यांनी सांगितलं. यामुळे विनोद कांबळी यांच्या आजरासंदर्भात त्यांच्या पत्नीला गंभीरता नसून तिने वर वर उत्तर दिल्याचे जाणवत आहे.

Follow Us
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल