Virat Kohli : 15 हजार धावा, 55 वं शतक… विक्रम मोडत असतानाही पाय जमिनीवर; सचिनबाबत विराटचं मन जिंकणारं वक्तव्य

विराट कोहलीची तुलना नेहमी महान फलंदाज सचिन तेंडुलकरशी केली जाते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सामन्यात दमदार शतक झळकावत कोहलीने आपल्या नावावर आणखी एक मोठा विक्रम नोंदवला. त्यानंतर सचिन आणि कोहली यांच्यातील तुलना पुन्हा चर्चेत आली आहे. आता यावर खुद्द विराटनेच मौन सोडलं आहे.

Virat Kohli : 15 हजार धावा, 55 वं शतक... विक्रम मोडत असतानाही पाय जमिनीवर; सचिनबाबत विराटचं मन जिंकणारं वक्तव्य
| Updated on: Sep 28, 2026 | 3:33 PM

भारतीय क्रिकेट संघातील ‘रन मशीन’ म्हणून ओळखला जाणाऱ्या विराट कोहलीची (Virat Kohli) बॅट चांगलीच तळपत्ये, तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. टी20 आणि कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतरही वनडे क्रिकेटमध्ये कोहलीच्या धावांची भूक कायम आहे. काल वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या वनडेत कोहलीने दमदार शतक झळकावत आपल्या फलंदाजीचा पुन्हा एकदा ठसा उमटवला. या सामन्यात शतक झळकावत कोहलीने त्याचं वनडे कारकिर्दीतलं 55वं शतक पूर्ण केलं. एवढंच नव्हे तर यासोबत त्याने वनडे क्रिकेटमध्ये 15 हजार धावांचा टप्पाही गाठला. या विक्रमानंतर पुन्हा एकदा कोहलीची तुलना सचिन तेंडुलकर (SachinTendulkar) याच्याशी होऊ लागली. मात्र, कोहलीच्या मते अशा प्रकारची तुलना करणं योग्य नाही.

विराट कोहली आजही सचिन तेंडुलकरला आदर्स मानतो. सचिनसोबत होणाऱ्या तुलनेबाबत त्याने आपल्या भावना अगी स्पष्ट शब्दांत व्यक्त केल्या. माझ्यासाठी सचिन तेंडुलकर हे नेहमीच ‘सचिन पाजी’ राहतील. त्याचप्रमाणे एम.एस . धोनी हा माझा पहिला कर्णधार म्हणून नेहमीच खास राहील, असंही त्याने नमूद केलं.

Loading...

कोहलीने सांगितलं की, ” माझ्यासाठी सचिन पाजी नेहमीच सचिन पाजी राहतील आणि एमएस धोनी माझा पहिला कर्णधार म्हणून नेहमीच तसाच राहील माझ्यातील या भावना कधीच बदलणार नाहीत. त्यांनी त्यांच्या काळात क्रिकेटमध्ये जी क्रांती घडवून आणली, ती आकडेवारी किंवा तुलनांपेक्षा खूप मोठी आहे. लोकांवर त्यांनी जो प्रभाव टाकला, तो कधीही विसरता येणार नाही” अशा शब्दांत विराटने त्यांचं कौतुक केलं.

 

स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणं म्हणजे अंताची सुरुवात

विराट कोहलीने यावेळी केवळ सचिनसोबतच्या तुलनेवरच भाष्य केलं नाही, तर यश आणि अहंकाराबाबतही विचार मांडले. त्याच्या मते, खेळाडूने कितीही मोठं यश मिळवलं तरी त्याने जमिनीवर पाय ठेवून राहणं महत्वाचं आहे. ” स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजण्याची भावना मनात आली, तर तिथूनच पतनाची सुरुवात होते. कठोर मेहनत करत राहणं, योग्य गोष्टी करणं आणि स्वतःला जमिनीवर ठेवणं हेच महत्त्वाचं आहे ” असे विचार विराटने मांडले.

‘जर तुमचे पाय जमिनीवर असतील, मेहनत करत राहिलात आणि योग्य गोष्टी केल्यात, तर मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे, असा विचार तुम्ही कधीच करणार नाही. कारण ज्या क्षणी तुम्हाला असं वाटू लागतं, तिथूनच तुमच्या अंताची सुरुवात होते,” असं कोहलीने सांगितलं.

जग मला जसं पाहतं, तसं मी स्वतःला पाहत नाही

चाहत्यांकडून मिळणारं प्रेम आणि स्वतःची सार्वजनिक प्रतिमा याबद्दलही कोहलीने मनमोकळेपणाने भाष्य केलं. जग माझ्याकडे ज्या नजरेने पाहते, त्या नजरेने मी स्वतःकडे पाहत नाही, असं त्याने सांगितलं. ” जेव्हा क्रिकेटवर प्रेम करणारे लोक मला भेटतात, तेव्हा ते मला ज्या नजरेने पाहतात, ते मी पूर्णपणे समजू शकत नाही. ते मला दुरून ज्या प्रकारे ओळखतात, त्या पद्धतीने मी स्वतःकडे पाहत नाही. मला माहीत आहे की मी कुठून आलो आहे आणि आजही मी तोच माणूस आहे” असं तो म्हणाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us