AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli: आणि मी आतून पूर्णपणे तुटलो… असं काय घडलं की विराट कोहली मानसिकदृष्टया खचला? ऐकाल तर मन सुन्न होईल

Virat Kohli News: विराट कोहलीने आता भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिका खेळण्यापूर्वी एक विधान केले होते ज्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

Virat Kohli: आणि मी आतून पूर्णपणे तुटलो... असं काय घडलं की विराट कोहली मानसिकदृष्टया खचला? ऐकाल तर मन सुन्न होईल
| Updated on: Sep 27, 2026 | 3:18 PM
Share

IND vs WI Odi: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात वनडे मालिका सुरु आहे. यांच्यात पहिला वनडे सामन्याला आज सुरुवात झाली आहे. भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण आता या सामन्यापूर्वी विराट कोहलीने एक विधान केले आता त्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी जिओस्टारशी बोलताना, विराट कोहलीने एक वेदनादायक खुलासा केला. त्याने २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धचा उपांत्य फेरीतील पराभव हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण क्षणांपैकी एक असल्याचे म्हटले. कोहली म्हणाला की, “हा पराभव स्वीकारणे माझ्यासाठी अत्यंत कठीण होते आणि अनेक महिने मी त्यातून मानसिकरित्या सावरू शकला नाही. २०१९ विश्वचषक उपांत्य फेरीतील न्यूझीलंडकडून झालेला १८ धावांचा पराभव स्वीकारणे अत्यंत कठीण होते आणि त्याचा परिणाम माझ्यावर अनेक महिने टिकून राहिला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पावसामुळे भारताचे अव्वल फलंदाज लवकर बाद झाले. जर तो सामना त्या दिवशी पूर्ण झाला असता, तर निकाल वेगळा लागला असता. त्या पराभवाने मला आतून तोडले…” २०१९ विश्वचषक उपांत्य फेरीची आठवण काढताना विराट कोहलीने आपल्या वेदना व्यक्त केल्या.

तो म्हणाला की, “निकालामुळे त्याला खूप दुःख झाले होते आणि पुढील काही महिने तो मानसिकदृष्ट्या त्यातून पूर्णपणे सावरू शकला नाही.  सामन्यात पावसामुळे आलेला व्यत्यय आणि दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी नव्या चेंडूने परिस्थितीचा फायदा घेण्याची दाखवलेली क्षमता, हे भारतासाठी एक मोठे नुकसान ठरले. अंतिम सामन्यात तो ५४ धावांवर फलंदाजी करत होता आणि मला वाटले होते की मी एक मोठी खेळी खेळू शकतो. पण बाद झाल्यानंतर, अनेक दिवस तो पराभव स्वीकारणे त्याच्यासाठी कठीण होते. कोहलीने २०२३ च्या विश्वचषकादरम्यान भारतीय संघातील वातावरण खूप सकारात्मक असल्याचे वर्णन केले. त्याने संघातील खेळाडूंमधील उत्कृष्ट समन्वय आणि एकमेकांसाठी खेळण्याच्या भावनेचे कौतुक केले.

Follow Us
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी