AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli: अरे मी आकड्यासाठी खेळणारा वाटतो का? सचिन तेंडुलकरांसोबत तुलना होताच विराटची तिखट प्रतिक्रिया, काय म्हणाला?

Virat Kohli On His Record: भारत वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावले. आता या शतकी खेळीसोबतच विराटने रेकॉर्डब्रेक कामगिरीही केली, यानंतर आता विराटने त्याच्या रेकॉर्डब्रेक कामगिरीवर आपले वि

Virat Kohli: अरे मी आकड्यासाठी खेळणारा वाटतो का? सचिन तेंडुलकरांसोबत तुलना होताच विराटची तिखट प्रतिक्रिया, काय म्हणाला?
| Updated on: Sep 29, 2026 | 11:18 AM
Share

Virat Kohli Records: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात वनडे मालिका सुरु असून पहिला सामना भारतीय संघाने जिंकला. आणखी दोन सामने शिल्लक आहेत. त्यानंतर समजेल की भारतीय संघ मालिका जिंकेल की नाही. पहिल्या सामन्यात विराट कोहलीने दमदार शतक झळकावले. आता यानंतर विराट कोहलीने एका मुलाखतीत बऱ्यात गोष्टींवर भाष्य केले आहे.

रविवार, २७ सप्टेंबर रोजी, तिरुवनंतपुरम येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात नाबाद १३९ धावांची खेळी करताना कोहलीने आपले ५५ वे एकदिवसीय शतक पूर्ण केले. या खेळीदरम्यान त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५,००० धावांचा टप्पाही ओलांडला. सचिन तेंडुलकरनंतर हा टप्पा गाठणारा तो दुसरा फलंदाज आहे.

BCCI.tv ला दिलेल्या मुलाखतीत विराट कोहली म्हणाला, “जर तुम्ही आकडेवारीच्या दृष्टिकोनातून पाहिले तर हा एक मोठा आकडा आहे. पण ध्येय सोपे आहे, वेगवेगळ्या परिस्थितीत संघाला विजयाकडे नेण्याचा प्रयत्न करणे. गेल्या अनेक वर्षांपासून मी हेच करण्याचा प्रयत्न करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी केवळ वैयक्तिक कामगिरीचे ध्येय ठेवणे हा योग्य मार्ग नाही. तुम्ही केवळ आकड्यांसाठी इतका काळ खेळू शकत नाही. जर तुम्हाला आकडे गाठायचे असतील, तर तुम्ही मुख्य ध्येयाशी तडजोड कराल आणि तुम्ही अशा प्रकारे जास्त काळ खेळू शकत नाही. १५,००० एकदिवसीय धावांसारखा टप्पा गाठणे विशेष आहे, परंतु त्यामुळे संघाला आणखी एक विजय मिळतो, ज्यामुळे आनंद अधिकच वाढतो.”

शुभमन गिलसोबत फलंदाजी करण्याबद्दल विराट कोहली म्हणाला की, क्रीजवर दोघांमध्ये जास्त चर्चा करण्याची गरज नसते. शुभमनला त्याचा खेळ आणि जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे समजतो. कधीकधी मी माझ्या  अनुभवाच्या आधारावर शुभमनला शॉट निवड किंवा खेळपट्टीच्या परिस्थितीबद्दल सूचना देतो, परंतु दोघांमधील बहुतेक संभाषण क्षेत्ररक्षणादरम्यान होते.” आता पुढील दोन सामन्यात दोन वेळा कोहलीकडे शतकी खेळी करण्याची संधी आहे. दोन्ही सामन्यात तो शतकी खेळी खेळून चाहत्यांचे मनोरंजन करतो का हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे...
Sanjay Raut : इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे....
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
SC Reservation : निर्णय झाला, पण अंमलबजावणी कुठे? अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
S. Chockalingam : मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
Shweta Mahale : बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; श्वेता महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार?; भायखळा ते....
Thackeray Brothers : 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार? राज-उद्धव ठाकरे 11.30 वाजता पत्रकार परिषद घेणार; भायखळा ते...
धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून..
Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून...., नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...
Mahayuti : एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...; शिवसेना आमदाराने सगळंच सांगून टाकलं
उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न!
Thakurli : उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न! वाळवी, पाणी अन्.... रहिवाशांचा संताप
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत