
क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. मुलाच्या जन्मानंतर विराट आणि अनुष्का शर्मा विदेशात शिफ्ट झाले असून जास्तीत जास्त वेळ आपल्या मुलासोबत आणि मुलीसोबत घालवताना दोघेही दिसतात. लंडनमध्ये एक सामान्य आयुष्य जगताना विराट कोहली दिसतो. विराट आणि अनुष्का भारत सोडून कायमचे विदेशात शिफ्ट होणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. काही दिवसांपूर्वीच विराट आणि अनुष्का भारतात येऊन गेले. मात्र, त्यांनी अजूनही आपल्या मुलाचा आणि मुलीचा चेहरा दाखवला नाही. विराट कोहलीच्या सामन्यावेळी अनुष्का शर्मा स्टेडियममध्ये पोहोचली होती. यादरम्यान वामिका तिच्यासोबत कडेवर होती, कॅमेरामॅनने विराटचे शतक पूर्ण झाल्यानंतर अनुष्का आणि वामिकाला कॅमेऱ्यात कैद केले आणि तो व्हिडीओ व्हायरल होताना दिसला.
त्यादरम्यान वामिका नेमकी कशी दिसते, हे कळाले. विराट कोहलीच्या मुलाचा एकही फोटो अजून पुढे आला नाहीये. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा विदेशात नवीन वर्षाचा खास स्वागत करताना दिसले. त्यांनी खास एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो चाहत्यांना आवडताना दिसतोय. विराट कोहली याने सोशल मीडियावर अनुष्का शर्मासोबतचा खास फोटो शेअर केला. ज्यामुळे दोघेही आनंदी दिसत आहेत.
विशेष म्हणजे विराट आणि अनुष्काने चेहऱ्यावर खास टॅटू तयार केल्याचे फोटोवरून दिसत आहे. विराट कोहली याने चेहऱ्यावर स्पायडरमॅनचा टॅटू काढला तर अनुष्का शर्मा हिने फुलपाखराचा टॅटू काढल्याचे फोटोवरून दिसत आहे. विराट कोहली याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 2026 मध्ये आयुष्याच्या प्रकाशासोबत आगमन करत आहे. विराट कोहली याने अनुष्का शर्मा हिला आपल्या आयुष्यातील प्रकाश म्हटले आहे.
यावरून विराट कोहली हा अनुष्का शर्मा हिच्यावर किती प्रेम करतो हे स्पष्ट होते. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा हा फोटो चाहत्यांना प्रचंड आवडताना दिसत आहे. लोक या फोटोवर दोघांनाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. विराट आणि अनुष्का काही दिवसांपूर्वीच भारतात आले होते आणि त्यांनी प्रेमानंद महाराजांचे दर्शनही घेतले होते. यादरम्यानचा त्यांचा एक व्हिडीओही तूफान व्हायरल होताना दिसला.