AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | आयपीएलच्या 14 व्या मोसमाआधी विराट कोहलीचा मोठा खुलासा, गोलंदाजांसाठी धोक्याची घंटा

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आयपीएलमध्ये सलामी (ipl 2021 Open) करणार आहे, याबाबतची माहिती स्वत: विराटने दिली आहे.

Video | आयपीएलच्या 14 व्या मोसमाआधी विराट कोहलीचा मोठा खुलासा, गोलंदाजांसाठी धोक्याची घंटा
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आयपीएलमध्ये सलामी (ipl 2021 Open) करणार आहे, याबाबतची माहिती स्वत: विराटने दिली आहे.
| Updated on: Mar 21, 2021 | 1:27 PM
Share

अहमदाबाद : “मी आयपीएलच्या 14 व्या मोसमात (IPL 2021) सलामीला खेळणार आहे. मी याआधीही अनेकदा वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. आमची मधली फळी फार मजबूत आहे. त्यामुळे 2 सर्वश्रेष्ठ खेळाडूंना टी 20 क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त चेंडू खेळायला मिळाले तर चांगलंच आहे”, असं म्हणत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आयपीएलमध्ये सलामी करण्याचे संकेत दिले आहेत. इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या टी 20 सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली या जोडीने सलामी केली. इंग्लंडला पाचव्या सामन्यात पराभूत करत भारताने 3-2 ने मालिका खिशात घातली. विजयानंतर विराट हर्षा भोगलेसोबत (Harsha Bhogale) बोलत होता. यावेळेस विराटने याबाबत प्रतिक्रिया दिली. (Virat Kohli will open in the 14th season of the IPL)

विराट काय म्हणाला?

“मला निश्चितच रोहितसोबत सलामी करायला आवडेल. आम्ही दोघे सलामीला आलो. दोघे सेट झालो. त्यानंतर प्रतिस्पर्धी संघाचा दोघांपैकी एकजण तरी चांगलाच समाचार घेईल, अस मला वाटतं. आम्ही दोघांनी चांगली सुरुवात केल्याने मागील फलंदाजांनाही चांगलं व्यासपीठ तयार होईल. ते ही मैदानात निडरपणे खेळतील. जे की टीमसाठी चांगली गोष्ट आहे. मी सलामीलाच खेळत राहणार. आगामी वर्ल्ड कपपर्यंत सलामीला खेळण्याचा माझा मानस असेल”, असंही विराटने यावेळेस स्पष्ट केलं.

विराटचा सलामीला येण्याचा उद्देश

आगामी टी 20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने टीम इंडिया अनेक प्रयोग करत आहे. या टी 20 मालिकेतही भारताने अनेक प्रयोग केले. आयपीएलमध्ये सलामीला येउन जोरदार सराव करण्याचा मानस विराटचा आहे. जेणेकरुन त्याचा फायदा टी 20 वर्ल्ड कपमध्ये होईल, हा विराटचा सलामीला येण्यामागचा उद्देश आहे.

रोहित-विराटची 94 धावांची सलामी भागीदारी

रोहित आणि विराटने इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या टी 20 सामन्यात सलामी केली. या दोघांनी 94 धावांची सलामी भागीदारी केली. यादरम्यान या दोघांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. विराटने या सामन्यात एकूण नाबाद 80 धावांची खेळी केली. तसेच विराट या संपूर्ण मालिकेत अफलातून खेळला. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला मालिकावीर पुरस्कारने गौरवण्यात आले. विराटने या मालिकेतील 5 सामन्यात एकूण 3 अर्धशतकांसह 231 धावा केल्या.

एकदिवसीय मालिका

दरम्यान या टी 20 मालिकेनंतर उभय संघात 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील तिनही सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. या मालिकेला 23 मार्चपासून सुरुवात होणार आहे.

संबंधित बातम्या :

Video | ‘हिटमॅन’ रोहितचा धमाका, युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा रेकॉर्ड ब्रेक

Virat Kohli | कर्णधार विराट कोहली ठरला ‘मॅन ऑफ द सीरिज’चा मानकरी

Virat Kohli | कोहलीचा ‘विराट’ कारनामा, अर्धशतकी खेळीसह रेकॉर्ड ब्रेक

(Virat Kohli will open in the 14th season of the IPL)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.