Virat Kohli | कोहलीचा ‘विराट’ कारनामा, अर्धशतकी खेळीसह रेकॉर्ड ब्रेक

विराट कोहलीने (Virat Kohli) इंग्लंड विरुद्धच्या 5 व्या टी 20 सामन्यात (india vs england 5th t20i) नाबाद 80 धावांची धमाकेदार खेळी केली.

Virat Kohli | कोहलीचा 'विराट' कारनामा, अर्धशतकी खेळीसह रेकॉर्ड ब्रेक
विराट कोहलीने (Virat Kohli) इंग्लंड विरुद्धच्या 5 व्या टी 20 सामन्यात (india vs england 5th t20i) नाबाद 80 धावांची धमाकेदार खेळी केली.
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 9:49 PM

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात (india vs england 5th t20i ) अहमदाबादमध्ये पाचवा टी 20 सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 ओव्हरमध्ये 224 धावा केल्या. यासह इंग्लंडला विजयासाठी 225 धावांचे आव्हान दिले. टीम इंडियाकडून कर्णधार (Virat Kohli) विराट कोहलीने 52 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 80 धावांची खेळी केली. यासह विराटने विक्रम केला आहे. (india vs england 5th t20i Virat Kohli has become the highest run scorer in T20 cricket as a captain)

कोहलीचा विराट कारनामा

विराट टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा कर्णधार ठरला आहे. याबाबतीत विराटने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचला पछाडलं आहे. विराटच्या नावे यासह आता टी 20 मध्ये कर्णधार म्हणून 1 हजार 463 धावांची नोंद झाली आहे. विराटने पछाडल्याने फिंचची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. फिंचच्या नावे कर्णधार म्हणून 1 हजार 462 धावांची नोंद आहे. तर याबाबीत तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा केन विलियम्सन आहे.

हिटमॅन रोहितचा विक्रम

रोहितने या सामन्यात विराटनंतर सर्वाधिक 64 धावांची खेळी केली. रोहित यासह टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. रोहितने न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टीलला पछाडत दुसरं स्थान पटकावलं. या सामन्याआधी या दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टील होता. गुप्टीलला पछाडण्यासाठी रोहितला 40 धावांची आवश्यकता होती. रोहित 2 हजार 800 धावा होत्या. पण रोहितने 40 धावा पूर्ण करताच गुप्टीलला पछाडलं. यासह रोहित टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. ताज्या आकडेवारीनुसार रोहितच्या नावे 111 सामन्यात 2 हजार 864 धावांची नोदं आहे. तर मार्टिन गुप्टीलच्या नावावर 2 हजार 839 धावा आहेत.

रोहित-विराटची 94 धावांची सलामी भागीदारी

दरम्यान टीम इंडियाने या पाचव्या सामन्यात शानदार सुरुवात केली. रोहित शर्मा आणि विराट कोहली या सलामी जोडीने टीम इंडियाला चांगली सुरुवात मिळवून दिली. या दोघांनी 94 धावांची सलामी भागीदारी केली. यादरम्यान या दोघांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. तसेच रोहित शर्माने आपले अर्धशतकही पूर्ण केलं.

इंग्लंडला विजयासाठी 225 धावांचे तगडे आव्हान

टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 225 धावांचे आव्हान दिले आहे. भारताने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 224 धावा केल्या. टीम इंडियाकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक नाबाद 80 धावांची खेळी केली. तसेच हिटमॅन रोहित शर्माने 34 चेंडूत 5 गगनचुंबी षटकार आणि 4 चौकारांसह अफलातून 64 धावांची खेळी केली. हार्दिक पांड्याने 39 धावा केल्या. तसेच सूर्यकुमार यादवने 32 रन्सची खेळी केली.

संबंधित बातम्या :

Rohit Sharma | ‘हिटमॅन’ रोहितचा धमाका, मार्टिन गुप्टीलचा रेकॉर्ड ब्रेक, विक्रमाला गवसणी

(india vs england 5th t20i Virat Kohli has become the highest run scorer in T20 cricket as a captain)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.