AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virendra Sehwag: वीरेंद्र सेहवागने सलमान खानसारखा घेतला निर्णय, आता लवकरच दिसणार…Video Viral

Virendra Sehwag New Show: आता रोहित शर्मानंतर वीरेंद्र सेहवागही टिव्ही शो हॉस्ट करणार आहे. नव्या लूकचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Virendra Sehwag: वीरेंद्र सेहवागने सलमान खानसारखा घेतला निर्णय, आता लवकरच दिसणार...Video Viral
| Updated on: Sep 17, 2026 | 9:39 AM
Share

जेव्हा जागतिक क्रिकेटमधील सर्वात धोकादायक सलामीवीरांची यादी तयार केली जाते, तेव्हा वीरेंद्र सेहवाग पहिल्या तीनमध्ये नक्कीच असतो. फॉरमॅट कोणताही असो, तो सामन्याच्या पहिल्या चेंडूपासूनच आपल्या फटक्यांची बरसात करायचा. अगदी सर्वोत्तम गोलंदाजही त्याच्या स्ट्राईकने घाबरत असत. वीरेंद्र सेहवागच्या स्वभावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचा विनोदी स्वभाव, जो त्याने आजही जपला आहे. सध्या, यमराजाच्या वेशातील त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

वीरेंद्र सेहवागचा नवा लूक समोर

व्हायरल फोटोत सेहवाग न्यूटनच्या वेशात एका झाडाखाली बसून पुस्तक वाचताना आणि सफरचंद खाली पडण्याची वाट पाहतानाही दिसतो. त्यानंतर, आयसीयूमध्ये एका रुग्णाशी बोलताना सेहवाग डॉक्टरच्या लूकमध्ये खूपच आकर्षक दिसत होता. आश्चर्याची गोष्ट तेव्हा घडली, जेव्हा तो शाळेच्या शिक्षकाच्या वेशात मुलांकडून सिट-अप्स करून घेत होता. नंतर असे समोर आले की, वीरेंद्र सेहवाग ‘राईज अँड फॉल सीझन २’ या रिॲलिटी शोचे सूत्रसंचालन करणार आहे.

ऍमेझॉन एमएक्स प्लेयरच्या ‘राईज अँड फॉल’ या शोच्या दुसऱ्या सीझनचे सूत्रसंचालन आता वीरेंद्र सेहवाग करणार आहे. पहिल्या सीझनचे सूत्रसंचालन अशनीर ग्रोव्हरने केले होते. सूत्रसंचालकासोबतच स्पर्धकांची यादीही जाहीर झाली असून, स्वरा भास्कर, करण पटेल आणि प्रियांका चहर चौधरी यांसारखी प्रमुख नावे नव्या सीझनमध्ये सामील झाली आहेत. गोविंदाच्या शोमधील एंट्रीचीही चर्चा आहे. अलीकडेच भाजप सोडलेले शहजाद पूनावाला हेदेखील या शोमध्ये स्पर्धक म्हणून सामील होणार असल्याची चर्चा आहे.

मागील शोमध्ये अनाया बांगर, आकृती अग्रवाल, अर्जुन बिजलानी, धनश्री वर्मा यांसारखे स्पर्धक सामील झाले होते. मागील वर्षी या स्पर्धेचा विजेता हा अर्जुन बिजलानी होता.  पेंटहाऊस आणि बेसमेंट या दोन वेगळ्या जगात खेळल्या जाणाऱ्या या गेममध्ये १५ सेलिब्रिटी असतील, जे ‘रुलर्स’ आणि ‘वक्रर्स’ या दोन गटांमध्ये विभागलेले असतील. ‘रुलर्स’ पेंटहाऊसच्या सुविधांचा आनंद घेतील, तर ‘वक्रर्स’ बेसमेंटमधील आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागेल.

Follow Us
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!