IND vs NZ : हा कुठला न्याय, केएल राहुल बसलेला असताना अक्षर पटेलला त्याच्याआधी पाठवायचं, भारताच्या पूर्व दिग्गज क्रिकेटपटूचा गंभीरला परखड सवाल
IND vs NZ : अक्षर पटेलने त्या कठीण स्थितीचा चांगला सामना केला. पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर तो असहाय्य वाटत होता. उसळी घेणाऱ्या चेंडूंनी त्याला अडचणीत आणलं. त्यानंतर केएल राहुल विकेटवर आला. पण राहुल खूप सहजतेने खेळत होता.

न्यूझीलंडने दुसऱ्या वनडे मध्ये टीम इंडियासमोर विजयासाठी 135 धावांचं माफक लक्ष्य ठेवलं होतं. पण या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय क्रिकेट संघाची चांगलीच दमछाक झाली. डकवर्थ लुईस नियमाने भारताने दुसराही सामना जिंकला. अन्यथा निकाल काय लागला असता हे कोणीही सांगू शकत नाही. या मॅचमध्ये टीम इंडियाने शनिवारी 39 रन्सवर तीन विकेट गमावलेले. त्यावेळी केएल राहुल डग आऊट प्रतिक्षा करत होता. अक्षर पटेल फलंदाजीसाठी मैदानात आला. अक्षर पटेलने त्या कठीण स्थितीचा चांगला सामना केला. पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर तो असहाय्य वाटत होता. उसळी घेणाऱ्या चेंडूंनी त्याला अडचणीत आणलं. त्यानंतर केएल राहुल विकेटवर आला. पण राहुल खूप सहजतेने खेळत होता. तेच दोन्ही टीम्सचे फलंदाज या विकेटवर तितक्या सहजतेने बॅटिंग करत नव्हते. आता काही माजी खेळाडूंनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलय. राहुलला अक्षरच्या आधी का नाही पाठवलं?.
टीम इंडियाचे माजी सिलेक्टर कृष्णमचारी श्रीकांत यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर हाच प्रश्न विचारला. अक्षर पटेलन नंतर राहुलला 6 व्या नंबरवर पाठवणं हा कुठला न्याय झाला?. राहुल एक महत्वाचा खेळाडू आहे हे गौतम गंभीरला समजलं पाहिजे असं श्रीकांत म्हणाले. भारतासाठी राहुलने नंबर 3 आणि नंबर 4 ला येऊन शतक बनवलं आहे. पण तरीही त्याला मागे ठेवलं जातं. हा घोर अन्याय आहे असं श्रीकांत म्हणाले. दुसऱ्या वनडेमध्ये फक्त राहुलच सहजतेने बॅटिंग करताना दिसत होता. परिस्थिती कठीण असते,तेव्हा फक्त दोन खेळाडू पुढे येतात विराट कोहली आणि केएल राहुल. मागच्या सामन्यात राहुल लवकर आऊट झाला असता, तर भारताचा डाव संपला असता. त्याच्याआधी अक्षरला फलंदाज करायला लावणं कसं योग्य ठरु शकतं? असा श्रीकांत यांचा सवाल आहे.
अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी
न्यूझीलंड दौऱ्यात सध्या वनडे सीरीज सुरु आहे. भारताने टी20 मालिका आधीच 3-2 ने जिंकली आहे. आता वनडे सीरीजमध्ये टीम इंडिया 2-0 ने आघाडीवर आहे. डकवर्थ लुईस नियमाने भारताने हे दोन्ही सामने जिंकले आहेत. यानंतर दोन्ही टीम्समध्ये टेस्ट सीरीज होईल. न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघ अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करतोय.