AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

के एल राहुलच्या जागी संघात आला नवखा खेळाडू, बीसीसीआयकडून थेट नाव जाहीर, कोण आहे शिखर मोहन?

Who Is Shikhar Mohan: के एल राहुल च्या जागी आत एका नवख्या मुलाची टीम इंडियात निवड झाली आहे. राहुलच्या जागी संघात स्थान मिळवणारा हा शिखर मोहन आहे तरी कोण ते पाहा...

के एल राहुलच्या जागी संघात आला नवखा खेळाडू, बीसीसीआयकडून थेट नाव जाहीर, कोण आहे शिखर मोहन?
| Updated on: Oct 23, 2026 | 1:41 PM
Share

KL Rahul Replacement: झारखंडचा सलामीवीर शिखर मोहनला न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्धच्या शेवटच्या दोन चार दिवसीय सामन्यांसाठी पहिल्यांदाच इंडिया ‘अ’ संघात बोलावण्यात आले आहे. न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्ध आपला पहिला चार दिवसीय सामना खेळल्यानंतर एकदिवसीय संघात निवड झालेल्या केएल राहुलची जागा हा २१ वर्षीय खेळाडू घेईल. हा डावखुरा फलंदाज सध्याच्या रणजी करंडक हंगामात उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून, त्याने सलग दोन शतके झळकावली आहेत. शिखरने जमशेदपूरमध्ये केरळविरुद्ध १४३ धावा केल्या आणि त्यानंतर पुण्यात महाराष्ट्राविरुद्ध १२७ धावांची खेळी केली.

शिखर मोहनचे मार्गदर्शक आणि झारखंडचे माजी क्रिकेटपटू इशान जग्गी यांनी या युवा खेळाडूचे कौतुक केले असून, शिखरसाठी पुढचे पाऊल उचलण्याची हीच योग्य वेळ असल्याचे म्हटले आहे. जग्गी म्हणाले, “हीच योग्य वेळ आहे. तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने रणजी करंडकात दोन शतके झळकावली आहेत. त्याने दुलीप करंडक अंतिम सामना आणि इराणी करंडकामध्येही शानदार कामगिरी केली होती.”

शिखरने २०२५-२६ मधील आपल्या पदार्पणाच्या हंगामात ५५.७३ च्या सरासरीने ६१३ धावा केल्या, ज्यात दोन शतकांचा समावेश होता. त्याने नव्या हंगामाची सुरुवातही दणक्यात केली. जमशेदपूरच्या कीनन स्टेडियमवर केरळविरुद्ध झारखंडच्या पहिल्या सामन्यात त्याने १४३ धावा केल्या. दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पूर्व विभागासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले, दोन्ही डावांमध्ये अनुक्रमे ८५ आणि ५२ धावा केल्या. त्यानंतर तो इराणी ट्रॉफीमध्ये ‘रेस्ट ऑफ इंडिया’ संघाकडून खेळला आणि श्रीनगरच्या हिरव्यागार खेळपट्टीवर ६० धावांची दमदार खेळी केली.

जग्गीने स्पष्ट केले की, “शिखर गेल्या चार-पाच वर्षांपासून सातत्यपूर्ण फॉर्ममध्ये आहे आणि त्याने वयोगट क्रिकेटवरही वर्चस्व गाजवले आहे.” शिखरने स्वतः कबूल केले की, मी नेहमीच मोठ्या खेळी खेळण्याचा प्रयत्नात असतो, कधी कधी अपयशी ठरलो की सरांसोबत काम करतो. चेंडूचा सामना करण्यापूर्वी, मी स्वतःशी बोलतो. मी स्वतःला चेंडूवर लक्ष ठेवण्याची आणि एकाग्र राहतो. यामुळे मला खूप मदत झाली आहे.” सरांनीही मला यात मदत केली, विशेषतः जेव्हा ते १९ वर्षांखालील संघात होते. मी एका वेळी एका चेंडूवर अधिक लक्ष केंद्रित करू लागलो. या दृष्टिकोनामुळे मला खरोखरच खूप मदत झाली आहे.”

तो म्हणाला, “प्रत्येकजण एका टप्प्यातून जातो, पण तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की मी सातत्याने ७० आणि ८० धावा करत आहे, जी काही लहान कामगिरी नाही. मी अजूनही नवखा आहे आणि मला स्वत:ला आणखी घडवायचे,  म्हणूनच मी म्हणालो की ही निवड योग्य वेळी झाली आहे.” शिखर २६ ऑक्टोबरला न्यूझीलंडसाठी रवाना होईल आणि क्राइस्टचर्चमध्ये भारत ‘अ’ संघात सामील होईल. दुसरा चार दिवसीय सामना ३१ ऑक्टोबरपासून तिथे खेळला जाईल.

Follow Us
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…
मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो - राज ठाकरे
Raj Thackeray : मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो; राज ठाकरेंचा दुष्काळावरून इशारा
AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; ऑडिओ क्लिपवरून जरांगे संतप्त
Manoj Jarange Patil : AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; कथित ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे पाटील संतप्त
जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले....
CM Devendra Fadnavis : जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले, संपूर्ण फॉरेन्सिक तपासणी...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख....
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख 15 हजार 697 शेतकऱ्यांना मिळणार लाभ
7 महिन्यांपासून पगार नाही; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
Pune : 7 महिन्यांपासून पगार नाही, 230 कामगार संकटात; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
Dilip Lande : शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मास्तर ढसाढसा रडले
NCP : नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मतदानाच्या काही तास आधी...कराळे मास्तर ढसाढसा रडले, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल...
Sanjay Raut : 500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल; अमित शहा, फडणवीस अन् शिंदेंना काय दिलं आव्हान
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप