AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN थरारक सामन्यात बांगलादेशचा विजय, मॅचमध्ये शेवटच्या षटकामध्ये जो ड्रामा रंगला तो सर्वच पाहत राहिले

IND vs BAN Match: शारजामध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात थरारक सामना दिसून आला. 'वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स'मध्ये विजेतेपदाचे दावेदार मानल्या जाणाऱ्या बांगलादेश चॅम्पियन्सने इंडिया चॅम्पियन्सला ३ धावांनी पराभूत करून एक मोठा उलटफेर घडवला.

IND vs BAN थरारक सामन्यात बांगलादेशचा विजय, मॅचमध्ये शेवटच्या षटकामध्ये जो ड्रामा रंगला तो सर्वच पाहत राहिले
| Updated on: Oct 12, 2026 | 2:21 PM
Share

IND vs BAN Match Result Update: शारजामध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात थरारक सामना दिसून आला. ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स’मध्ये विजेतेपदाचे दावेदार मानल्या जाणाऱ्या बांगलादेश चॅम्पियन्सने इंडिया चॅम्पियन्सला ३ धावांनी पराभूत करून एक मोठा उलटफेर घडवला. १४२ धावांचे लक्ष्य असताना, भारताला त्यांच्या निर्धारित २० षटकांत आठ गडी गमावून केवळ १३८ धावाच करता आल्या. बांगलादेशच्या विजयात डावखुरा फिरकी गोलंदाज इनामुल हक ज्युनियर आणि अबू जायेद राही यांच्या अखेरच्या षटकांतील गोलंदाजीने महत्त्वाची भूमिका बजावली. भारताला शेवटच्या षटकात १२ धावांची गरज होती.

मॅचमध्ये काय घडलं?

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश चॅम्पियन्सने 20 षटकांत 9 गडी गमावून 141 धावांचा डोंगर उभारला. त्यामुळे इंडिया चॅम्पियन्ससमोर 142 धावांचे लक्ष्य होते. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला विजयासाठी शेवटच्या षटकात 12 धावांची आवश्यकता होती. त्यावेळी पवन नेगी आणि पियुष चावला हे दोन फलंदाज मैदानावर उपस्थित होते.

बांगलादेशने अखेरचे षटक टाकण्याची जबाबदारी अबू जायेदकडे सोपवली. पवन नेगीने शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली. त्यानंतर एक वाईड चेंडू पडल्याने भारताला एक अतिरिक्त धाव मिळाली. दुसऱ्या चेंडूवर पियुष चावलाने एक धाव घेतली, यानंतर तिसऱ्या चेंडूवर नेगीने पुन्हा एक धाव घेतली. अशाप्रकारे, पहिल्या तीन चेंडूंनंतर भारताच्या खात्यात एकूण चार धावा जमा झाल्या. त्यामुळे विजयासाठी भारताला उर्वरित तीन चेंडूंमध्ये आता आठ धावा करायच्या होत्या.

सामन्याचा निकाल भारताच्या बाजूने लागण्याची आशा आणखी कायम होती. चौथ्या चेंडूवर पियुष चावलाने दोन धावा घेतल्यामुळे भारताला विजयासाठी सहा धावांची गरज होती. या परिस्थितीत मोठा फटका मारून सामना जिंकण्याची संधी होती.  पण पियुष चावला आणि पवन नेगी यांनी या दोन चेंडूंवर प्रत्येकी एक धाव घेतली. परिणामी इंडिया चॅम्पियन्सला या षटकात केवळ आठ धावाच करता आल्या. बांगलादेश चॅम्पियन्सने तीन धावांनी थरारक शेवटच्या षटकांत विजय मिळवला.

Follow Us
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...