AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yuzvendra Chahal-Dhanashree : मला घटस्फोटाबद्दल… धनश्रीपासून वेगळं झाल्यावर चहलचं मोठं विधान

अभिनेत्री धनश्री वर्माशी झालेल्या घटस्फोटाबद्दल क्रिकेटपटू युजवेंद्र चहल उघडपणे बोलला आहे. धनश्रीने चहलबद्दल अनेक टिप्पण्या केल्या होत्या, आता मात्र तो..

Yuzvendra Chahal-Dhanashree : मला घटस्फोटाबद्दल... धनश्रीपासून वेगळं झाल्यावर चहलचं मोठं विधान
युजवेंद्र चहल - धनश्री वर्मा
| Updated on: Jan 11, 2026 | 9:48 AM
Share

भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलचे (Yuzvendra Chahal) वैयक्तिक आयुष्य खूप चर्चेत असतं. क्रिकेट आणि खेळापेक्षा तो पर्सनल आयुष्यातील घटनांमुळे लाइमलाइटमध्ये राहिला आहे. गेल्या वर्षीच त्याचा आणि अभिनेत्री धनश्री वर्माचा घटस्फोट झाला. चार वर्षांच्या वैवाहिक नात्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर चहलने मूव्ह ऑन केलं असून तो बरेचदा आरजे महवशसोबत दिसला होता. त्यांच्या दोघांच्या डेटिंग लाइफचीदेखील चर्चा सुरू झाली. मात्र आम्ही फक्त मित्र आहोत, असं दोघांनीही वेळोवेळी म्हटलं आहे.

घटस्फोट- डेटिंगवर काय म्हणाला चहल ?

गेल्या वर्षी घटस्फोट झाल्यानंतर धनश्री चहलबद्दल बरंच काही बोलली. “राईज अँड फॉल” या रिॲलिटी शो दरम्यान तिने क्रिकेटपटूवर अनेक आरोप केले आणि त्यांच्या घटस्फोटाबद्दलही चर्चा केली. धनश्रीच्या आरोपांनंतर चहलनेही प्रत्युत्तर देत तिला बरंच काही सुनावलं. त्यानंतर त्याने आता पुन्हा घटस्फोटाचा मुद्दा उपस्थित केला आहे. मी माझ्या आयुष्यात पुढे गेलो आहे आणि आता तो धनश्रीसोबतच्या घटस्फोटाच्या मुद्यावर अडकून रहायचं नाहीये असं चहलने स्पष्ट केलं.

एका मुलाखतीत तो या विषयावर स्पष्ट बोलला. “माझ्या आयुष्यात एक अध्याय होता जो आता संपला आहे. मी तिथून आता पुढे गेलो आहे. मी त्यावर काही बोलेन मग त्यावर पुन्हा रिॲक्शन येईल. मला त्या जागी अडकून राहायचे नाही. माझं आयुष्य आता माझं आहे,फक्त माझंय.. एक सोपी गोष्ट आहे, तिने तिच्या आयुष्यात खुश रहावं आणि मी माझ्या आयुष्यात सुखाने राहीन. खुश रहा यार… कशाला इतर कोणाला दुखवायचं ?” असं चहलने नमूद केलं.

पुढे चहलने त्यांच्या डेटिंगच्या अफवांवरही भाष्य केले, लंडनमध्ये महवशसोबत दिसला होता, त्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली. “मी एखाद्या मित्रासोबत वेळ घालवत असलो तर व्हिडिओ बाहेर येतो. मी कोणत्याही नात्यात नाहीये, मी आनंदाने सिंगल आहे,” असं चहल म्हणाला. “मी इंटरनेटला इतके गांभीर्याने घेत नाही. जिथे लोक तुमच्यावर प्रेम करतात तिथे थोडासा द्वेषही असतो.” असं सोशल मीडियावरील त्याच्या ट्रोलला उत्तर देताना चहल म्हणाला.

लहानपणापासून सहन केलं ट्रोलिंग

” मला त्याचा (ट्रोलिंग) फारसा त्रास होत नाही. मी माझ्या आयुष्यात सर्व गोष्टींचा सामना केला आहे, शिव्यांपासून ते ट्रोलिंगपर्यंत. म्हणून मी त्यातून पुढे गेलो आहे. लोक तुम्हाला शिव्या देतील, त्याचं बोलणं सोडून द्या. तुम्ही आनंदी रहा. मी आयुष्यात बॉडी शेमिंगही सहन केलंय. आधी फरक पडायचा मला कारण तेव्हा सोशल मीडियात नवं होतं. पण आता फरक पडत नाही. ज्यांना यायचं त्यांनी या, शिव्या द्या आणि जा ” असं त्याने म्हटलं.

दरम्यान घटस्फोटानंतर युजवेंद्र चहल आणि धनश्री पुन्हा एकत्र दिसू शकतात अशी चर्चा आहे. ‘द 50’ या रिॲलिटी शो मध्ये दोघे एकत्र दिसू शकतात. हा एक नवा रिॲलिटी शो असून त्याच्या फॉरमॅटबद्दल अजून पूर्ण समोर माहिती आलेली नाही. धनश्री आणि चहल यांच्या एकत्र यांच्या येण्याचा बातमीने चाहते खूप उत्सुक आहेत. त्यांच्या सहभागाबद्दल अजून कन्फर्मेशन आलेलं नाही.

नाशिककरांनी सत्ता दिली होती पण... CM फडणवीसांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
नाशिककरांनी सत्ता दिली होती पण... CM फडणवीसांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल.
'महायुतीचा प्रचार भरकटलेला...' आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल
'महायुतीचा प्रचार भरकटलेला...' आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल.
जो राम का नाही वो काम का नाही! फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला
जो राम का नाही वो काम का नाही! फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला.
... मगच नवऱ्याला जेवण वाढा! पंकजा मुंडेंच्या विधानाची रंगली चर्चा
... मगच नवऱ्याला जेवण वाढा! पंकजा मुंडेंच्या विधानाची रंगली चर्चा.
'ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला...' बड्या नेत्याचा ठाकरेंवर हल्लाबोल
'ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला...' बड्या नेत्याचा ठाकरेंवर हल्लाबोल.
निवडणूक प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकाचा तो व्हिडीओ व्हायरल
निवडणूक प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकाचा तो व्हिडीओ व्हायरल.
हिंदू-मुस्लिम वादाशिवाय फडणवीसांचं भाषण दाखवा! उद्धव ठाकरेंचं चॅलेंज
हिंदू-मुस्लिम वादाशिवाय फडणवीसांचं भाषण दाखवा! उद्धव ठाकरेंचं चॅलेंज.
'करून दाखवलं’ बॅनरवरून वाद पेटला: ठाकरे, फडणवीस, शिंदे एकमेकांवर बरसले
'करून दाखवलं’ बॅनरवरून वाद पेटला: ठाकरे, फडणवीस, शिंदे एकमेकांवर बरसले.
... तर मैदान मारल्याशिवाय आम्ही परतत नाही! सतेज पाटलांचं विधान
... तर मैदान मारल्याशिवाय आम्ही परतत नाही! सतेज पाटलांचं विधान.
भाजपच्या प्रचारासाठी मैथिली ठाकूर मुंबईत; गायलं मराठी गाणं
भाजपच्या प्रचारासाठी मैथिली ठाकूर मुंबईत; गायलं मराठी गाणं.