गुगलमध्येही मी टू? 48 जणांना नोकरीवरुन काढलं!

सॅन फ्रान्सिस्को : परदेशातून भारतात आलेलं मी टूचं वादळ पुन्हा परदेशात परतल्याचं चित्र आहे. आता तर हे वादळ थेट गुगलच्या कार्यालयात घोंघावलं. गुगलने लैंगिक शोषणाच्या आरोपांवरुन, आतापर्यंत एक-दोन नव्हे तर तब्बल 48 जणांना नोकरीवरुन काढून टाकलं आहे. यामध्ये 13 वरिष्ठांचा समावेश आहे.  मागील दोन वर्षात ही कारवाई केल्याचं गुगलने म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी […]

गुगलमध्येही मी टू? 48 जणांना नोकरीवरुन काढलं!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:04 PM

सॅन फ्रान्सिस्को : परदेशातून भारतात आलेलं मी टूचं वादळ पुन्हा परदेशात परतल्याचं चित्र आहे. आता तर हे वादळ थेट गुगलच्या कार्यालयात घोंघावलं. गुगलने लैंगिक शोषणाच्या आरोपांवरुन, आतापर्यंत एक-दोन नव्हे तर तब्बल 48 जणांना नोकरीवरुन काढून टाकलं आहे. यामध्ये 13 वरिष्ठांचा समावेश आहे.  मागील दोन वर्षात ही कारवाई केल्याचं गुगलने म्हटलं आहे.

महत्त्वाचं म्हणजे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी हे पत्रक जारी केलं आहे.

बातमीवर स्पष्टीकरण

गुगलने हे स्पष्टीकरण न्यूयॉर्क टाईम्सच्या एका बातमीनंतर दिलं आहे. न्यूयॉर्क टाईम्सने आपल्या बातमीत गुगलचे वरिष्ठ कर्मचारी, अँड्रॉईडवर काम करणारे अँडी रुबिन यांच्यावर आरोप झाल्याने, गुगलने त्यांना 9 कोटी डॉलर एग्झिट पॅकेज देऊन कंपनीतून काढून टाकण्यात आल्याचं म्हटलं होतं. तसंच गुगलने लैंगिक छळाची प्रकरणं दाबण्याचा प्रयत्न केल्याचंही या बातमीत म्हटलं होतं.

या बातमीनंतर माध्यमांनी गुगलची प्रतिक्रिया मागितली. त्यावर कंपनीने सीईओ सुंदर पिचाई यांच्या नावे स्पष्टीकरण दिलं. त्यानुसार गेल्या दोन वर्षात 13 सिनीयर मॅनेजरसह 48 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकलं आहे. मात्र कोणालाही एक्झिट पॅकेज म्हणून एकही रुपया दिलेला नाही, असं गुगलने म्हटलं आहे.

पिचई म्हणाले, “काही वर्षांपासून कंपनीने अनेक बदल केले आहेत. ज्यामध्ये अधिकारी पदावरील वरिष्ठांच्या वर्तनाबद्दल कडक कारवाईचाही समावेश आहे. गुगलबाबत ज्या बातम्या आल्या आहेत, त्या खोट्या आहेत”

इतकंच नाही तर आम्ही सुरक्षित आणि सर्वसमावेशक कार्यस्थळ तयार करण्यासाठी नेहमीच गंभीर असतो. आम्ही केवळ लैंगिक छळाच्याच नव्हे तर प्रत्येक तक्रारीची चौकशी करतो, त्यानंतर कारवाई करतो, असंही पिचईंनी म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.