व्हॅलेनटाईन डे निमित्त सॅमसंगच्या फोनवर 7 हजार रुपयांची सूट

व्हॅलेनटाईन डे निमित्त सॅमसंगच्या फोनवर 7 हजार रुपयांची सूट

मुंबई : व्हॅलेनटाईन डे जवळ येत आहे. अशावेळी जर तुम्ही तुमच्या खास व्यक्तीला गिफ्ट देण्यासाठी स्मार्टफोन देण्याचा विचार करत आहे, तर सॅमसंग आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सवर ऑफर देत आहे. कंपनीने आपल्या Galaxy Note 9 आणि Galaxy S9+ स्मार्टफोनवर बेस्ट डे ऑफरची घोषणा केली आहे. इथे तुम्हाला डिस्काऊंट, कॅशबॅक आणि गॅलेक्सी वॉचवर धमाकेदार अशी ऑफर दिली जात आहे.

अशा आहेत ऑफर्स

Samsung Galaxy Note 9 डील

Galaxy Note 9 च्या 8 GB रॅम आणि 512 GB स्टोअरेजच्या व्हेरिअंटला 84,900 रुपयामध्ये लाँच करण्यात आले होते. मात्र 7 हजारच्या डिस्काऊंटनंतर हा फोन 77,900 रुपयांमध्ये विकला जाणार आहे. यासोबतच एचडीएफसी क्रेडिट आणि डेबिट कार्ड यूजर्स यावर 8 हजार रुपयांचा अतिरिक्त डिस्काऊंट मिळवू शकतात. यामुळे हा फोन एचडीएफसी यूजर्सला 69,900 रुपयांत मिळणार आहे.

जर तुमच्याकडे एचडीएफसी क्रेडिट आणि डेबिट कार्ड नसेल, तर तुम्ही अपग्रेड ऑफरसह एक्सचेंज बोनसमध्ये 9 हजार रुपयांची सूट मिळवू शकता. तसेच 6 GB रॅम आणि 128 GB स्टोअरेज ग्राहकांसाठी 58,900 रुपये आणि 8 GB रॅम आणि 512 GB चा व्हेरिअंट 68,900 रुपयामध्ये विकत घेऊ शकता.

Galaxy Note 9 खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी Galaxy Watch (42mm) 9,999 रुपयात खरेदी करता येऊ शकते. या स्मार्ट वॉचची वास्तविक किंमत 24,990 रुपये आहे. तुम्हाला या वॉचवर 14,991 रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे.

Samsung Galaxy S9+ डील

Galaxy S9+ वर 7 हजार रुपयांचा डिस्काऊंट दिला जात आहे. यानंतर 64 GB व्हेरिअंट 57,900 रुपये, 128 GB व्हेरिअंट 61,900 रुपये आणि 256 GB व्हेरिअंट ग्राहकांना 65,900 रुपयामध्ये खरेदी करता येणार आहे. एचडीएफसी बँकच्या कॅशबॅक ऑफरसह तुम्हाला 6 हजार रुपयांची सूट मिळणार आहे. अशामध्ये या व्हेरिअंटची किंमत अनुक्रमे 51,900 रुपये आणि 59,900 रुपये होईल.

Galaxy Note9 सारखे Galaxy S9+ वर सुद्धा ज्यांच्याकडे एचडीएफसी बँकचे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड नाही अशा ग्राहकांसाठी 9 हजार रुपयांपर्यंत अपग्रेड बोनस ऑफर दिली जाणार आहे. तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन देऊन Galaxy S9+ चा 256 GB स्मार्टफोन 56,900 रुपयामध्ये, 128 GB व्हेरिअंटला 52,900 रुपये आणि 64 GB व्हेरिअंटला 48,900 रुपये खरेदी करु शकता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *