VIDEO : फुग्याला बांधून स्मार्टफोन पाठवला, redmi note 7 ने आकाशातून फोटो टिपला

मुंबई : स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये आज मोठी स्पर्धा सुरु आहे. प्रत्येकजण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवत आहे. चीनच्या शाओमी कंपनीनेही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हटके अशा पद्धतीने स्मार्टफोनचं प्रमोशन केलं आहे. नुकतेच कंपनीने रेडमी नोट 7 लाँच केला. या नव्या फोनचे प्रमोशन कंपनीने थेट अंतराळातून केलं आहे. शाओमीने ‘Out of the world’ स्मार्टफोन सिद्ध करण्यासाठी फोनचे …

VIDEO : फुग्याला बांधून स्मार्टफोन पाठवला, redmi note 7 ने आकाशातून फोटो टिपला

मुंबई : स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये आज मोठी स्पर्धा सुरु आहे. प्रत्येकजण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवत आहे. चीनच्या शाओमी कंपनीनेही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हटके अशा पद्धतीने स्मार्टफोनचं प्रमोशन केलं आहे. नुकतेच कंपनीने रेडमी नोट 7 लाँच केला. या नव्या फोनचे प्रमोशन कंपनीने थेट अंतराळातून केलं आहे.

शाओमीने ‘Out of the world’ स्मार्टफोन सिद्ध करण्यासाठी फोनचे प्रमोशन थेट अंतराळातून केले. कंपनीच्या यूरोप टीमने रेडमी नोट 7 ला एका हायड्रोजन फुग्याच्या सहाय्याने 33 हजार 375 मीटर उंचीवर अंतराळात पाठवले. जिथे तापमान -58 अंश सेल्सिअस होते. अशा ठिकाणी फोन पाठवून फोनच्या माध्यमातून पृथ्वीचे फोटो क्लिक केले आहेत.

रेडमी नोट 7 च्या हटके अशा प्रमोशनमुळे सर्वत्र या फोनची चर्चा सुरु आहे. यामुळे रेडमी फोनला मोठ्या प्रमाणात ग्राहकांचा प्रतिसाद मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

चीनच्या मायक्रो ब्लॉगिंग साईट Weibo वर शाओमीच्या सीईओने एक पोस्ट करत म्हटले, “रेड मी नोट 7 ने अंतराळातून पृथ्वीचा फोटो घेतला आहे. तसेच फोन जेव्हा खाली परतला तेव्हा तो व्यवस्थित कामही करत होता.”

रेडमी नोट 7 लाँच होण्या आधीच कंपनीने फोनला हाय क्वॉलिटी फोन म्हणून प्रमोट केले होते.  रेडमी नोट 7 बजेट फोन आहे. तसेच कंपनीने फोनवर 18 महिन्यांची गॅरंटी दिली आहे.

फीचर

भारतात रेडमी नोट 7 यावर्षी फेब्रुवारी महिन्यात लाँच झाला होता. 3 जीबी, 4 जीबी, 6 जीबी रॅमसोबत 32 जीबी आणि 64 जीबी स्टोअरेज व्हेरिअंटमध्ये हा फोन उपलब्ध आहे. फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 660 ऑक्टा-कोर प्रोसेसरवर काम करतो. 6.3 इंचाचा डिस्प्ले फोनमध्ये दिला आहे.

रेडमी नोट 7 मध्ये 48+5 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. तसेच 4,000mAh बॅटरी आहे.

व्हिडीओ : 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *