सॅमसंगचा नवा ‘अँड्रॉईड गो’ Galaxy J4 core स्मार्टफोन लवकरच बाजारात

मुंबई: सध्या मोबाईल आणि इंटरनेट जगतात टेलिकॉम कंपन्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा चालू आहे. भारतात पहिले स्थान मिळविलेल्या शाओमी कंपनीमुळे इतर कंपन्यांना चांगलाचा फटका बसत आहे. शाओमी कंपनी कमी पैशात चांगल्या सोयी-सुविधा असलेले फोन भारतीय बाजारपेठेत विकत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने ग्राहक शाओमीकडे आकर्षित होत आहेत. प्रत्येक मोबाईल कंपनी नव-नवीन फीचर्स देत ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करुन …

सॅमसंगचा नवा ‘अँड्रॉईड गो’ Galaxy J4 core स्मार्टफोन लवकरच बाजारात

मुंबई: सध्या मोबाईल आणि इंटरनेट जगतात टेलिकॉम कंपन्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा चालू आहे. भारतात पहिले स्थान मिळविलेल्या शाओमी कंपनीमुळे इतर कंपन्यांना चांगलाचा फटका बसत आहे. शाओमी कंपनी कमी पैशात चांगल्या सोयी-सुविधा असलेले फोन भारतीय बाजारपेठेत विकत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने ग्राहक शाओमीकडे आकर्षित होत आहेत. प्रत्येक मोबाईल कंपनी नव-नवीन फीचर्स देत ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करुन घेण्याचा प्रयत्न करत आहे.
नुकतेच सॅमसंगनेही नवीन स्मार्टफोन अँड्रॉईड गो (Galaxy J4 core) मोबाईल आपल्या वेबसाईटवर प्रसिध्द केला. या मोबाईलची किंमत अजून कंपनीकडून अधिकृतपणे सांगण्यात आली नाही. पण मोबाईलचे फीचर्स पाहता नक्कीच फोन लोकांच्या पसंतीस उतरेल, असा दावा कंपनीने केला आहे.
सॅमसंग आपल्या Galaxy J4 सीरिजचा सध्या विस्तार करत असल्याचे दिसत आहे. याच सीरिजचा एक नवी अँड्रॉईड-गो (Galaxy J4 core) स्मार्टफोन ब्राझीलमध्ये ऑनलाईन लिस्ट केला आहे. भारतात हा फोन पुढील वर्षी ऑगस्ट 2019 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.
Galaxy J4 core चे फीचर्स?
अँड्रॉईड 8.1 ओरियो (गो एडिशन) सॅमसंग गॅलेक्सी जे 4 कोर, स्मार्टफोन ड्युअल-सिम, यामध्ये 18.9 रेशोसोबत सहा इंचाचा एचडी पल्स 720×1480 पिक्सलचा डिसप्ले दिला आहे.
यामध्ये एक जीबी रॅमसोबत 1.4GJz क्वॉड-कोर प्रोसेसर उपलब्ध आहे.
इंटरनल मेमरी 16 जीबी आहे, तसेच कार्डच्या मदतीने तुम्ही मेमरी 256 जीबीपर्यंत वाढवू शकता.
या फोनचा रियर कॅमेरा 8 मेगापिक्सल आहे. सोबत रियर एलईडी फ्लॅश सुध्दा दिला आहे. तर सेल्फी कॅमेरा 5 मेगापिक्सल असून फ्रंट कॅमेऱ्यासाठीही एलईडी फ्लॅश दिला आहे.
यासोबतच 4जी, ब्लूटूथ 4.2, Wi-Fi 802.11b/g/n, GPS आणि GPRS चा सपोर्ट देण्यात आला आहे. सॅमसंग जे4 ची बॅटरीची क्षमता 3,300mAh आहे. या मोबाईलचे वजन 170 ग्रॅम आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *