फक्त 697 रुपयांत खरेदी करा शाओमीचा ‘हा’ फोन

मुंबई : स्मार्टफोनच्या युगात अनेक कंपन्या नव-नवीन स्मार्टफोन लाँच करत असतात. त्यासोबतच अनेक ऑफर्स दिल्या जातात. सध्या शाओमीनेही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक बंपर अशी ऑफर सुरु केली आहे. ज्यामध्ये फक्त 697 रुपयांत तुम्ही शाओमीचा फोन खरेदी करु शकता. तुम्ही जर स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही सहज 697 रुपयांत फोन खरेदी करु शकता. …

फक्त 697 रुपयांत खरेदी करा शाओमीचा ‘हा’ फोन

मुंबई : स्मार्टफोनच्या युगात अनेक कंपन्या नव-नवीन स्मार्टफोन लाँच करत असतात. त्यासोबतच अनेक ऑफर्स दिल्या जातात. सध्या शाओमीनेही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक बंपर अशी ऑफर सुरु केली आहे. ज्यामध्ये फक्त 697 रुपयांत तुम्ही शाओमीचा फोन खरेदी करु शकता.

तुम्ही जर स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही सहज 697 रुपयांत फोन खरेदी करु शकता. एवढ्या रुपयात तुम्ही शाओमीचा स्मार्टफोन रेडमी 6ए (Redmi 6A) घरी आणू शकता. हा बजेट स्मार्टफोनमध्ये प्रसिद्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये अप्रतिम असे फीचर आहेत. गेल्यावर्षी हा फोन भारतात लाँच केला होता. बजेट स्मार्टफोनमध्ये या फोनचे नाव घेतले जाते.

697 रुपयात खरेदी करु शकता Redmi 6A

तुम्हाला वाटत असेल की, 5999 रुपयांचा स्मार्टफोन 697 रुपयांत कसा खरेदी केला जाऊ शकतो. साहजिकच, हा प्रश्न कुणालाही पडेल. मात्र अमेझॉनवर शाओमीने या फोनवर एक्सचेंज ऑफर दिली आहे. यामध्ये कंपनी एक्सचेंज ऑफरवर 5302 रुपये देत आहे. जर तुमच्याकडे कोणता जुना फोन असेल, ज्याची किंमत या ऑफरमध्ये 5302 रुपयापर्यंत जात आहे. मग तुम्ही 5999 रुपयांतून 5302 घटवले, तर तुम्ही हा फोन 697 रुपयांत खरेदी करु शकता. त्यामुळे ही सुवर्ण संधी तुम्हाला मिळत आहे.

Redmi 6A चे फीचर

  • 5.45 इंच आकाराचा डिस्प्ले
  • रिअर कॅमेरा 13 मेगापिक्सल
  • सेल्फी कॅमेरा 5 मेगापिक्सल
  • एलईडी फ्लॅश
  • अँड्रॉईड 8.1 Oreo
  • रॅम 2 जीबी
  • 3,000mAh बॅटरी क्षमता
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *