सोनी कंपनीचा नवा कॅमेरा लाँच, एका सेकंदात 20 फोटो, भन्नाट फीचर्स, किंमत किती?

सोनी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने काल (5 डिसेंबर) फुल फ्रेम इंटरचेंजेबल लेन्स कॅमेरा Alpha 9 II भारतात लाँच (Sony launch new camera) केला. या कॅमेराची किंमत तब्बल 3 लाख 99 हजार 990 रुपये आहे.

Sony launch new camera, सोनी कंपनीचा नवा कॅमेरा लाँच, एका सेकंदात 20 फोटो, भन्नाट फीचर्स, किंमत किती?

मुंबई : सोनी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने काल (5 डिसेंबर) फुल फ्रेम इंटरचेंजेबल लेन्स कॅमेरा Alpha 9 II भारतात लाँच (Sony launch new camera) केला. या कॅमेराची किंमत तब्बल 3 लाख 99 हजार 990 रुपये आहे. हा कॅमेरा लाँच केल्यानंतर देशातील सर्व सोनी सेंटरमध्ये उपलब्ध राहील, असं कंपनीने लाँचिंग दरम्यान (Sony launch new camera) सांगितले.

Alpha 9 II ओरिजनल Alpha-9 च्या फीचर्सवर आधारीत आहे. ज्यामध्ये अप्रतिम असा ग्राऊंड ब्रेकिंग स्पीड आहे. त्यासोबतच यामध्ये ऑटो फोकस आणि ऑटो एक्सपोजर ट्रॅकिंग आहे. या कॅमेरामध्ये एका सेकंदात 20 फोटो काढता येऊ शकतात, असं कंपनीने सांगितले आहे.

हा कॅमेरा मॅकेनिकल शटरसह 10 एफपीएससह सलग शूट करु शकतो. कॅमेरामध्ये अधिक क्षमता असल्यामुळे परफॉर्मन्स चांगला ठरू शकतो, असं बोललं जात आहे.

नवीन Alpha 9 II मध्ये अॅडव्हान्स फोकस सिस्टम आहे. ज्यामध्ये 693 फोकल-प्लेन फेज-डिटेक्शन एएफ पॉइंटचा समावेश आहे. हा कॅमेरा 93 टक्के फोटोचे क्षेत्र कव्हर करु शकतो. तसेच यामध्ये 425 कॉन्ट्रास्ट एएफ पॉइंटचाही समावेश आहे.

नवीन कॅमेराला मॅकेनिकल शटरसह 10 एफपीएसपर्यंत शूट करण्यासाठी बनवण्यात आले आहे. या नव्या कॅमेराचा स्पीड Alpha-9 पेक्षाही दुप्पट आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *