भारतात महिंद्रा ‘एसयूव्ही Alturas G4’ लाँच, पहा काय किंमत आणि वैशिष्ट्ये

मुंबई : बरेच दिवस चर्चेत असलेली महिंद्रा ‘एसयूव्ही Alturas G4’ भारतात लाँच झाली आहे. कंपनीने 2 WD आणि 4 WD असे दोन वेरिएंट बाजारात आणले आहेत. महिंद्रा Alturas G4 च्या दोन्ही वेरियंटची किंमत अनुक्रमे 26.95 लाख आणि 29.95 लाख आहे. बाजारात या गाडीची स्पर्धा Ford Endeavour आणि टोयोटा Fortuner या दोन गाड्यांसोबत होईल असं बोललं …

भारतात महिंद्रा ‘एसयूव्ही Alturas G4’ लाँच, पहा काय किंमत आणि वैशिष्ट्ये

मुंबई : बरेच दिवस चर्चेत असलेली महिंद्रा ‘एसयूव्ही Alturas G4’ भारतात लाँच झाली आहे. कंपनीने 2 WD आणि 4 WD असे दोन वेरिएंट बाजारात आणले आहेत. महिंद्रा Alturas G4 च्या दोन्ही वेरियंटची किंमत अनुक्रमे 26.95 लाख आणि 29.95 लाख आहे. बाजारात या गाडीची स्पर्धा Ford Endeavour आणि टोयोटा Fortuner या दोन गाड्यांसोबत होईल असं बोललं जात आहे.

महिंद्रा Alturas G4 मध्ये 2.2 लीटर डीजेल इंजिन आहे. जे 4000rpm वर 178 bhp पॉवर आणि 420 Nm पीक टॉर्क जनरेट करते. यात मर्सेडीजसारखा 7 स्पीड ऑटोमॅटीक गिअरबॉक्स आहे. नवीन एसयूव्हीमध्ये कंपनीने पेट्रोल इंजिनचा पर्याय दिलेला नाही. या कार सध्या विक्रीसाठी महिंद्राच्या नवीन World of SUV दुकानात उपब्ध आहे.

एसयूव्ही Alturas G4चा शानदार लूक

यामध्ये इंटीग्रेटेड एलईडी डेटाझम रनिंग लॅम्प्ससोबत  HID हॅंडलॅम्प्स दिले आहेत. Alturas G4 एसयूव्हीमध्ये 18 इंच अलॉय वील्ज. इंटिग्रेटेड टर्न सिग्नल लाईट्स सोबत ORVM, एलईडी टेलटॅम्प्स आणि इंटिग्रेटेड ब्रेक लाईट्स सोबत रुफ माउंटेड स्पॉईलर दिले आहे.

Alturas G4 फीचर

 • 8 इंचाचा टचस्क्रिन इन्फओटेनमेंट सिस्टम
 • 7 इंचाचा मल्टीइन्फॉर्मेशन डिस्प्ले
 • इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक
 • टू जोन क्लाईमेट कंट्रोल
 • कल्टेड सीट्स
 • 360- डिग्री कॅमेरा
 • इलेक्ट्रिक टेलगेट
 • सनरुफ

 

सेफ्टी फीचर्स

 • 9 एअरबॅग्स
 • इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम
 • ARP, HDC, HAS, BAS, आणि ESS सारखे फीचर आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *