15,000 हून कमी रकमेचे 5 स्मार्टफोन, 5G आणि मोठी बॅटरी क्षमता
जर तुम्ही तुमच्या बजेटमध्ये स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही यादी पाहा बाजारातून स्वस्त स्मार्टफोन कमी होत असले तरी, काही फोन अजूनही कमी किमतीत मिळत आहेत.

बजेट स्मार्टफोन्स महाग झाले आहेत. बाजारात स्वस्त स्मार्टफोन आता दहा हजारात नव्हे तर १५ हजारात मिळत आहे. त्यातही कमी पर्याय आहेत. परंतू काही स्मार्टफोन या सेगमेंटमध्ये चांगली किंमत ऑफर करत आहेत. या बजेटमध्ये 5G फोन, 120Hz डिस्प्ले, 50MP कॅमरा आणि मोठी बॅटरी सारखे फिचर्स मिळू शकतात. मात्र, प्रत्येक फोनमध्ये सर्वकाही चांगले मिळू शकत नाही. कोणात डिस्प्ले चांगला तर कशात गेमिंग चांगले आणि बॅटरीवर जास्त लक्ष दिले जात आहे. येथे आपण असे पाच स्मार्टफोन पाहणार आहोत ज्यांची किंमत १५ हजाराच्या आसपास किंवा त्याहून कमी आहे. याची किंमत आणि उपलब्धता ऑनलाईन स्टोअरवर बदलू शकते. त्यामुळे खरेदी आधी सध्याची किंमत तपासा..
1. Infinix Note 50X 5G
जर तुम्ही फोनवर गेम खेळत असाल वा एक साथ अनेक एप्सचा वापर करत असाल तर Infinix Note 50X 5G वर नजर देऊ शकता. याची किंमत सुमारे 13,499 रुपयांनी सुरु होते. यात MediaTek Dimensity 7300 Ultimate प्रोसेसर दिला आहे. जो या बजेटमध्ये या फोनची खासियत आहे.
यात फोनमध्ये 6.67 इंचाच डिस्प्ले असून तो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. यात 5G कनेक्टिव्हीटी देखील आहे. मात्र, याच्या स्क्रीनचा रिझोल्युशन HD+ आहे,जर तुम्हाला जास्त स्वच्छ आणि शार्प डिस्प्ले हवा असेल तर या कमतरता लक्षात घ्यावी, किंमत आणि फिचर्सच्या हिशेबाने हा फोन परफॉर्मन्सला प्राधान्य देणाऱ्यासाठी एक चांगला पर्याय आहे.
2. iQOO Z9x 5G: मोठी बॅटरी आणि फास्ट चार्जिंग
iQOO Z9x 5G त्या लोकांसाठी फायदेशीर होऊ शकतो, जे फोनचा वापर दीर्घकाळापर्यंत करतात. याच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजवाल्या स्टोरेजवाल्या व्हेरिएंटची ऑनलाईनची किंमत सुमारे 10,424 रुपये आहे. 6GB रॅमवाला व्हेरिएंट सुमारे 11,999 रुपयात येतो.
या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर दिला आहे. यात 6.72 इंचाची Full HD+ स्क्रीन आहे, जी 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करते. फोनमध्ये 6,000mAh ची तगडी बॅटरी मिळते आणि ती 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. या फोनचा मुख्य कॅमेरा 50MP आहे आणि 2MP चा डेप्थ सेंसर आहे. सेल्फीसाठी 8MP चा कॅमेरा मिळतो. याची मोठी बॅटरी आणि Full HD+ डिस्प्ले यास दैनंदिन वापरासाठी रंजक बनवते. मात्र, हे जुने मॉडेल आहे. त्यामुळे खरेदी आधी सॉफ्टवेअर अपडेट आणि उपलब्धतेची माहिती घ्यावी.
3. Poco M7 Pro 5G: AMOLED डिस्प्लेचा फायदा
जर तुम्ही या बजेटमध्ये चांगली स्क्रीन मिळवू इच्छीता तर Poco M7 Pro 5G ला घेऊ शकता. याच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत सुमारे 14,999 रुपये आहे. फोनमध्ये 6.67 इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले मिळतो. हा फोन 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो, ज्यामुळे स्क्रॉलिंग आणि अॅनिमेशन जास्त स्मूद दिसू शकते. यात 50MPचा मुख्य रिअर कॅमरा आणि 20MP चा फ्रंट कॅमरा मिळतो.
फोनमध्ये 5,110mAh ची बॅटरी मिळते, जी 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.याला IP64 रेटिंग मिळालेली आहे. जी धुळ आणि पाण्याच्या शिंपडण्यापासून सुरक्षा देते. हा फोन Android 14 सोबत लाँच केला होता आणि याच्या सॉफ्टवेयर अपडेट संदर्भात मर्यादा आहेत.
4. Lava Virat V1 5G: भारतीय ब्रँडचा स्वस्त फोन
कमी किंमतीत देशी ब्रँडचा फोन हवा तर Lava Virat V1 5G एक पर्याय आहे.याचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजवाला व्हेरिएंटची किंमत ऑनलाइन ऑफरमध्ये सुमारे 11,999 रुपयांपर्यंत आहे. 128GB स्टोरेजवाला व्हेरिएंट सुमारे 14,499 रुपयात लिस्टेट आहे. या फोनमध्ये 6.75 इंचाची HD+ स्क्रीन आणि 6,000mAh ची बॅटरी मिळते. या फोनमध्ये 6.75 इंचाची की HD+ स्क्रीन आणि 6,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन Android 16 वर चालतो आणि यात Unisoc T8200 प्रोसेसर मिळतो. फोनला 13MPचा रिअर कॅमरा आणि 5MP चा फ्रंट कॅमरा दिलेला आहे. याची मोठी बॅटरी आणि नवीन Android व्हर्जन याची खासियत आहे. परंतू कॅमेरा आणि प्रोसेसर जास्त दमदार नाही. याशिवाय चार्जर देखील 10W चा असून फोन 18W पर्यंत चार्जिंग सपोर्ट करतो.
5. Poco M7 5G: कमी बजेटमध्ये 5G चा पर्याय
जर तुमचे बजेट 15,000 हून खूप कमी आहे. तर Poco M7 5G चा विचार करु शकतो. याची किंमत सुमारे 12,499 सांगितली जाते. या फोनमध्ये 5G कनेक्टिव्हीटी सह 6.88 इंचाची मोठी स्क्रीन मिळते.
फोनमध्ये Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर आणि 5,160mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. मागे 50MP चा मेन कॅमेरा मिळतो. जे रोजचे काम, व्हिडीओ पाहणे आणि सोशल मीडिया आणि सामान्य एप्सचा वापर करतात त्यांच्यासाठी सामान्य एप्सचा वापर करण्यासाछी स्वस्त फोन हवा.
याच्या मोठ्या स्क्रीनचा रिझ्योल्युशन Full HD+ नाही. जर जास्त शार्प फोटो हवे, चांगला गेमिंग वा प्रीमीयम डिस्प्ले हवा तर Poco M7 Pro 5G वा Infinix Note 50X 5G सारखे पर्याय देखील पाहू शकता.
