यूट्यूबवर फेमस होण्याचं वेड, 9 वर्षाच्या लेकराने बापाचे क्षणात उडवले सव्वा कोटी; लेकामुळे आता थेट नोकरी जाण्याची वेळ !
यूट्यूबवर बनण्याच्या नादात 9 वर्षांच्या मुलाने वडिलांच्या ऑफीसच्या क्रेडिट कार्डवरून 1.13 कोटी रुपये उडवले. जास्त व्ह्यूज मिळवण्याच्या नादात केलेला हा खतरनाक जुगाड कुटुंबाला भलताच महागात पडला, आणि वडिलांच्या नोकरीवर टांगती तलवार लटकत्ये, ते वेगळंच..

सध्याच्या काळात सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्याचं वेड आजकाल अनेकांना लागलं. मात्र त्या नादात लोकं काहीही करायला तयार होतात. असाचा एका चक्रावून टाकणारा प्रकार समोर आलाय, ज्याबद्दल वाचल्यावर तुम्हीही हैराण व्हाल. एक नऊ वर्षांच्या मुलाने, जास्त व्ह्यूज मिळवण्याच्या नादात त्याच्या वडिलांच ऑफीसचं क्रेडिट कार्ड गुपचूप वापरलं आणि तब्बल 1.13 कोटी रुपये खर्च केले. त्या मुलाच्या निष्काळजीपणामुळे आणि अतरंगी कारभारामुळे, त्याच्या वडिलांच्या नोकरीवर आता संकट घोंगावतंय. ही माहिती समोर येताच प्रचंड खळबळ माजली आहे.
नक्की घडलं तरी काय ?
हे संपूर्ण प्रकरण एका नऊ वर्षांच्या मुलाशी आणि त्याचे वडील, डेव्ह यांच्याशी निगडीत आहे. माईक नावाचा हा मुलगा Mighty Mike Plays या नावाने यूट्यूब चॅनेल चालवतो, त्यावर तो Minecraft आणि रोबोटिक्स किंवा Roblox सारखे गेमप्ले व्हिडीओ अपलोड करत असतो. प्रत्येक छोट्या क्रिएटरप्रमाणे माइकलाही या गोष्टीचं टेन्शन होतं की त्याच्या व्हिडीओवर जास्त व्ह्यूज येत नाहीत. त्याची निराशा दूर करण्यासाठी त्याचे वडील डेव्ह यांनी त्याला YouTube Ads च्याबद्दल माहिती दिली. तेव्हा वडिलांनी त्याला फक्त 20 डॉलर्स (सुमारे 1600 -1700 रुपये) चं एक छोटंस ॲड कँपेन सेट करणं शिकवलं. बजेट कसं तयार करायचं, ऑडियन्सची निवड कशी करायची आणि जाहिरात कशी लाईव्ह होते, हे त्यांनी त्याला शिकवलं.
मुलाने वापरला भयानक शॉर्टकर्ट
वडिलांची शिकवण तर माईकने लक्षात ठेवली, पण बजेटचा मुद्दा तो विसरून गेला. आपण जेवढे जास्त पैसे लावू, व्हिडीओवर तेवढेच जास्त व्ह्यूज मिळतील, असं त्याला वाटलं . गूगल अकाऊंटमध्ये त्याच्या वडिलांच्या ऑफीसचं क्रेडिट कार्ड आधीपासूच सेव्ह होतं. त्यानंतर जवळपास पुढले तीन आठवडे माईक हा एकटाच ॲड टूल्स मध्ये जायचा आणि एकापेक्ष एक अशा महागड्या जाहिरातीचं खँपेन तो लाँच करत होता.
गूगलने देखील कोणत्याही अडथळ्याशिवाय, प्रत्येक कँपेनचं पेमेंट त्याच्या वडिलांच्या ऑफीसच्या क्रेडिट कार्डमधून कापायला सुरूवात केली. मात्र तीन महिन्यांनी जेव्हा एकूण बिल समोर आलं, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते बिल थोडंथोडकं नव्हे तर, तब्बल 1,18,000 डॉलर म्हणजे भारतीय रुपयांमध्ये ती किंमत सुमारे 1.13 कोटी रुपये इतकी होती.
कंपीन मीटिंगमध्ये झाली पोलखोल
डेव्ह यांना ऑफिसच्या कॉन्फरन्स रूममध्ये बोलावण्यात आलं तेव्हा त्यांना या संपूर्ण प्रकाराबद्दल समजलं. तेव्हा तिथे कंपनीचे मॅनेजर, एचआर आणि फायनान्स टीम उपस्थित होती. त्यांनी तीन आठवड्यांच्या जाहिरातींचा संपूर्ण खर्चाचा हिशोब डेव्ह यांच्यासमोर ठेवला आणि त्यांच्याकडून याबद्दल स्पष्टीकरण मागितलं. आता स्वतःची नोकरी वाचेल का की त्यांना ही संपूर्ण रक्कम स्वतःच्या खिशातून भरावा लागेल, याची डेव्ह यांना कल्पना नाही.
मजेदार गोष्ट म्हणजे डेव्ह यांच्या मुलाची, माईकची ही युक्ति सफल ठरली. एवढा मोठा खर्च केल्यानंतर माइकच्या व्हिडिओला दोन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. आम्हाला यूट्यूबवर लांबलचक गेमिंग जाहिराती पाहायला मिळत आहेत, असं अनेक यूजर्सनी सोशल मीडियावर लक्षात आणून दिलं. जेव्हा वडिलांनी माइकला याबद्दल जाब विचारला, तेव्हा मुलाने अगदी निरागसपणे उत्तर दिलं, “I’m definitely cooked,” ( मी खूपच अडचणीत सापडलोय) असं तो म्हणाला.
या धक्कादायक घटनेनंतर माईकच्या कुटुंबाने सध्या हे चॅनल बंद करण्याचा किंवा काही काळासाठी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पॅरेंटल कंट्रोल, खर्चाची मर्यादा निश्चित करणं आणि सेव्ह केलेल्या पेमेंट डिटेल्स डिलीट करणं यांसारखी कडक पावलं आता उचलली जात आहेत. विशेष म्हणजे, या सर्व माहितीचा खुलासा स्वतः माईकच्या वडिलांनी त्यांच्या मुलाच्या चॅनलवर व्हिडिओ पोस्ट करून केला. या घटनेमुळे सध्या खळबळ माजली असून सर्व्त्र त्याचीच चर्चा सुरू आहे.
