Airtel च्या करोडो ग्राहकांसाठी चिंताजनक बातमी, कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

एअरटेल कंपनी पुन्हा एकदा रिचार्ज प्लॅन महाग करण्याची शक्यता आहे. कंपनीचे उपाध्यक्ष आणि एमडी गोपाल विट्टल यांनी आगामी काळात रिचार्ज किंमत वाढवणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Airtel च्या करोडो ग्राहकांसाठी चिंताजनक बातमी, कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Airtel Plans
| Updated on: Aug 09, 2025 | 6:26 PM

देशभरात एअरटेलचे कोट्यवधी ग्राहक आहेत. या सर्वांना आता मोठा धक्का बसणार आहे. एअरटेल कंपनी पुन्हा एकदा रिचार्ज प्लॅन महाग करण्याची शक्यता आहे. कंपनीने याबाबत तसे संकेतही दिले आहेत. कंपनीचे उपाध्यक्ष आणि एमडी गोपाल विट्टल यांनी आगामी काळात रिचार्ज किंमत वाढवणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी जुलैमध्ये एअरटेल आणि इतर सर्व टेलिकॉम कंपन्यांनी आपापले रिचार्ज प्लॅन महाग केले होते, त्यामुळे अनेकांनी बीएसएनएलमध्ये पोर्ट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा खाजगी कंपन्या आपल्या रिचार्ज प्लॅनची किंमत वाढवण्याची शक्यता आहे. एअरटेलने याचे संकेत दिले आहेत. यापूर्वी व्होडाफोन-आयडियाचे सीईओ अक्षय मुंद्रा यांनीही याबाबत भाष्य केले होते.

गोपाल विट्टल यांचे संकेत

एअरटेलचे अध्यक्ष आणि एमडी गोपाल विट्टल यांनी कंपनीच्या पहिल्या तिमाहीबद्दल बोलताना म्हटले की, ‘भारतातील रिचार्जची किंमत रचना विसंगत आहे. कमी रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना मोठे डेटा फायदे, कॉलिंग आणि मेसेजिंग मिळतात की त्यामुळे ते महागडा प्लॅन खरेदी करत नाही. त्यामुळे श्रीमंत लोक कमी पैसे देऊन फायदा मिळवत आहेत. मात्र त्याचवेळी गरीब लोकांना ऐपतीपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत. आम्हाला आता गरिबांकडून शुल्क आकारण्याची गरज नाही.’ याचाच अर्थ आगामी काळात काही रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढू शकतात.

एअरटेलच्या उपाध्यक्षांनी सांगितले की, ‘भारतात इंडोनेशियासारखे प्राईस मॉडेल असते, तर कंपनीचा प्रति वापरकर्ता सरासरी महसूल वाढला असता. एअरटेलचा महसूल जून 2025 मध्ये एका वर्षापूर्वीच्या 211 रुपयांवरून 250 रुपयांपर्यंत वाढला आहे. त्याचबरोबर ग्राहकांचा मोबाइल डेटा वापर देखील 13.4 % ने वाढून 26.9 जीबी प्रति महिना झाला आहे.’ भारतात गेल्या वर्षी रिचार्ज महागले असले तरी, भारतातील डेटा प्लॅन अजूनही बऱ्याच देशांच्या तुलनेत स्वस्त आहेत. त्याचबरोबर भारतातील ग्राहक इतर देशांच्या तुलनेत जास्त इंटरनेट वापरत असल्याचेही समोर आले आहे.