iPhone 17 आणि iPhone 16 ईएमआयवर नाही मिळणार , मग कॅश देऊनच खरेदी करावे लागणार? युझर्सकडे पर्याय काय?
iPhone 17, iPhone 16 EMI Option: आयफोनची नवीन मालिका बाजारात दाखल झाली आहे. त्यानंतर आता जुन्या ॲपल फोन सीरीजविषयी मोठी अपडेट समोर येत आहे. त्यानुसार, iPhone 17 आणि iPhone 16 ईएमआयवर नाही मिळणार. मग खरेदीदारांकडे पर्याय तरी काय?

iPhone 18 सीरीज लाँच झाली आहे. त्यानंतर देशातंर्गत iphone 17 आणि जुन्या आयफोन मॉडेलची मागणी वाढली आहे. नवीन आयफोनच्या किंमती पाहूनच अनेकांना धक्का बसला आहे. त्यामुळे ग्राहकांनी जुन्या आयफोनकडे मोर्चा वळवला आहे. अर्थात ॲपलने जुन्या आयफोनची सुद्धा किंमत वाढवली आहे. भारतात iPhone 17 आणि iPhone 16 च्या जुन्या किंमतीतील मॉडलचा शोध सुरू झाला आहे. टिप्सटर अभिषेक यादव यांनी एक दावा केला आहे की, Apple ने iPhone 17 आणि iPhone 16 जुन्या किंमतींवर ईएमआय चा पर्याय, हप्त्यावर आयफोन देणे बंद केले आहे. युझर्स, ग्राहक हा मोबाईल जुन्या किंमतीत नगदी खरेदी करू शकतात.
नवीन मॉडेल EMI वर
आयफोन 18 सीरीज लाँच झाल्यावर ॲपल कंपनीने आयफोन 17, आयफोन 16 सह दुसर्या मॉडेलच्या किंमतीत वाढ केली आहे. माहितीनुसार, मार्केटमध्ये अद्याप आयफोन 17 आणि आयफोन 16 चे मॉडेलच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे युझर्स ईएमआयचा पर्याय अनेक जण शोधत होते. पण टिप्सटर अभिषेक यादव यांच्या दाव्यानुसार, Apple ने iPhone 17 आणि iPhone 16 च्या जुन्या किंमतींवर ईएमआयचा पर्याय बंद केला आहे. हे दोन्ही आयफोन ग्राहकांना रोखीत, नगदीत खरेदी करावे लागतील. तर ज्या मॉडलच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. त्यांच्या खरेदीसाठी EMI चा पर्याय उपलब्ध आहे.
जुना आयफोन नगदी खरेदी करावा लागणार?
iphone 17 आणि iphone 16 ची जुनी मॉडेल खरेदी करण्यासाठी ग्राहकांकडे केवळ रोखीचा, नगदीचा पर्याय उरला आहे का? तर असे नाही. हे दोन्ही मॉडेल वन टाईम ऑनलाईन पेमेंट देऊन खरेदी करता येऊ शकतो. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वा यूपीआई पेमेंटद्वारे हा फोन खरेदी करता येतो. क्रेडिट कार्ड युझर असाल तर आयफोन खरेदी करून बँकेचा ईएमआय पर्याय आहे. EMI चा पर्याय कंपनीने बंद केला आहे. पण क्रोमा, रिलायन्स डिजिटल सारख्या प्लॅटफॉर्मवर ईएमआयची सुविधा मिळू शकते.
iPhone 17 आणि iPhone 16 ची नवीन किंमत काय?
iPhone 17 हा भारतात 82,900 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. तर याचे दुसरे 256GB चे व्हेरिएंट 99900 रुपयांना आहे. तर 512 जीबी मॉडलसाठी 1 लाख 24 हजार 900 रुपये द्यावे लागतील. कंपनीने बेस व्हेरिएंटमध्ये 17 हजार रुपयांची वाढ केली आहे. iPhone 16 ची किंमत 79,900 रुपये आहे. तर 128GB मॉडेल आता 89900 रुपये इतकी आहे. दोन्ही फोनच्या किंमतीत कंपनीने जवळपास 10 हजार रुपयांची वाढ केली आहे.
