AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या 49 रुपयांमध्ये Disney+ Hotstar चं सब्सक्रिप्शन, निवडक युजर्ससाठी ऑफर

व्हिडीओ स्ट्रीमिंग कंपनी Disney+ Hotstar निवडक Android युजर्ससाठी नवीन मासिक मोबाइल प्लॅनचं टेस्टिंग करत आहे. मोबाइल प्लॅन युजर्ससाठी सिलेक्टेड पेमेंट मेथड्सवर युजर्ससाठी 49 रुपयांचा मासिक प्लॅन उपलब्ध आहे.

अवघ्या 49 रुपयांमध्ये Disney+ Hotstar चं सब्सक्रिप्शन, निवडक युजर्ससाठी ऑफर
Disney Plus Hotstar
| Edited By: | Updated on: Dec 21, 2021 | 7:40 PM
Share

मुंबई : व्हिडीओ स्ट्रीमिंग कंपनी Disney+ Hotstar निवडक Android युजर्ससाठी नवीन मासिक मोबाइल प्लॅनचं टेस्टिंग करत आहे. मोबाइल प्लॅन युजर्ससाठी सिलेक्टेड पेमेंट मेथड्सवर युजर्ससाठी 49 रुपयांचा मासिक प्लॅन उपलब्ध आहे. ही स्कीम अॅड सपोर्टसह येते आणि यासह, ग्राहकांना स्मार्टफोन किंवा टॅबलेटवर संपूर्ण Disney+ Hotstar कॅटलॉगमध्ये प्रवेश मिळेल. मात्र युजर्स एका वेळी फक्त एकाच डिव्हाइसवर लॉग इन करण्यास सक्षम असतील. युजर्सना 720p HD व्हिडिओ रिझोल्यूशन आणि स्टिरीओ ऑडिओ क्वालिटीचा अॅक्सेस मिळेल. (Disney+ Hotstar giving monthly subscription at Rs 49 to selected users)

Disney + Hotstar च्या कस्टमर सपोर्टनुसार, निवडक Android युजर्ससाठी 49 रुपयांचा मोबाइल प्लॅन ट्रायल म्हणून सादर करण्यात आला आहे. इतर Disney+ Hotstar प्लॅन्स वार्षिक आधारावर उपलब्ध असताना, Disney+ Hotstar युजर्ससाठी ही पहिली मासिक स्कीम आहे.

काही अँड्रॉइड युजर्स ज्यांनी हा प्लॅन यापूर्वी Disney+ Hotstar वर पाहिला होता त्यांनी Reddit वर प्लॅनचे तपशील देत स्क्रीनशॉट पोस्ट केले आहेत. या डेव्हलपमेंटबद्दल नोटिफिकेशन सर्वात आधी ओन्ली टेककडून मिळालं आहे. त्यांच्या अहवालानुसार, जर युजर्सनी कार्ड, पेटीएम, फोनपे किंवा UPI द्वारे पैसे दिले तर Disney + Hotstar चा 99 रुपयाचा प्लॅन 49 रुपयांमध्ये मिळेल.

मोबाईल प्लॅनवर 100 रुपयांची सूट

Disney+ Hotstar 6 महिन्यांच्या मेम्बरशिपसाठी उपलब्ध असलेल्या मोबाईल प्लॅनवर 100 रुपयांची सूट देत आहे. 299 रुपये किंमत असलेला मोबाइल प्लॅन 6 महिन्यांसाठी मेंबरशिप घेतल्यानंतर 199 रुपयांमध्ये मिळेल. या वर्षाच्या सुरुवातीला, सप्टेंबरमध्ये, Disney+ Hotstar ने एक नवीन सबस्क्रिप्शन पॅक जाहीर केला आहे जो 1 सप्टेंबरपासून लाईव्ह झाला आहे.

Disney+ Hotstar चे तीन नवीन प्लॅन्स सादर

Disney+ Hotstar ने तीन नवीन प्लॅन्स सादर केले आहेत, ज्यामध्ये मोबाइल प्लॅन (वार्षिक) 499 रुपये, सुपर प्लॅन 899 रुपये (वार्षिक) आणि प्रीमियम प्लॅन 1499 रुपयांमध्ये (वार्षिक) आहे. प्रीमियम युजर्ससाठी फायदे समान राहतील, सर्वात बेसिक प्लॅनची ​​किंमत 499 रुपये असेल आणि ती फक्त 1 मोबाइल डिव्हाइसपुरती मर्यादित असेल.

इतर बातम्या

iPhone 13 सिरीजवर 20000 रुपयांची सूट, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर?

Xiaomi 12 या महिन्यात लाँच होणार, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

ऑनलाईन फूड ऑर्डर करताय? 1 जानेवारीपासून द्यावा लागणार टॅक्स

(Disney+ Hotstar giving monthly subscription at Rs 49 to selected users)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.