iPhone 13 सिरीजवर 20000 रुपयांची सूट, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर?

Apple कंपनीने नुकतीच त्यांची लेटेस्ट iPhone 13 सिरीज लाँच केली आहे. दरम्यान, आता कंपनी iPhone 13 सीरीजवर 20,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. या ऑफरमध्ये iPhone 13 Mini, iPhone 13 आणि iPhone 13 Pro Max यांचा समावेश आहे.

iPhone 13 सिरीजवर 20000 रुपयांची सूट, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर?
Apple iPhone 13
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 6:00 AM

iPhone 13 Series Discount Offer : Apple कंपनीने नुकतीच त्यांची लेटेस्ट iPhone 13 सिरीज लाँच केली आहे. दरम्यान, आता कंपनी iPhone 13 सीरीजवर 20,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. या ऑफरमध्ये iPhone 13 Mini, iPhone 13 आणि iPhone 13 Pro Max यांचा समावेश आहे. ही ऑफर फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे आणि एक्सचेंज ऑफरद्वारे याचा लाभ घेता येईल. 16 डिसेंबरपासून सुरू झालेल्या आणि 21 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार्‍या फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलदरम्यान तिन्ही iPhones वर डिस्काऊंट उपलब्ध आहेत. ( Flipkart discount offer on Apple iPhone 13 series; get up to 20000 discount)

iPhone 13 वरील डिस्काऊंट ऑफर

iPhone 13 ची रिटेल प्राइस 79,900 रुपये आहे. डिस्काउंट ऑफरचा भाग म्हणून, Flipkart ब्रँडेड Axis Bank क्रेडिट कार्ड वापरून केलेल्या खरेदीसाठी iPhone 13 वर 5 टक्के सूट देत आहे. यामुळे फोनवर 3,995 रुपयांची सूट मिळणार आहे. त्यामुळे फोनची किंमत जवळपास 75,905 रुपये असेल.

खरेदीदार अतिरिक्त सूट मिळविण्यासाठी एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकतात. फ्लिपकार्ट एक्सचेंजवर 15,450 रुपयांपर्यंत ऑफर देत आहे. मात्र ही किंमत स्मार्टफोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असते. हे सर्व मिळून iPhone 13 हा फोन 19,445 रुपयांच्या सवलतीसह 60,455 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

iPhone 13 Pro Max आणि iPhone 13 mini

हीच ऑफर iPhone 13 Mini तसेच iPhone 13 Pro Max वरही उपलब्ध आहे. Flipkart iPhone 13 Mini वर Axis Bank क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड ऑफर देखील देत आहे. iPhone 13 Mini 69,900 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या फोनची किंमत आणखी कमी करण्यासाठी, तुम्ही Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे 5 टक्के कॅशबॅक ऑफर मिळवू शकता आणि एक्सचेंज ऑफरवर 14,250 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता.

ही ऑफर लागू करून, iPhone 13 Pro Max वर प्रचंड सवलत मिळू शकते. iPhone 13 Pro Max 1,29,900 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तसेच ग्राहक फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे 5 टक्के कॅशबॅक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरवर 15,450 पर्यंत सूट मिळवू शकतात.

याशिवाय, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आयफोन 12 सीरीज चांगल्या डिस्काउंटसह विकत आहे. iPhone 12, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max सारखे मॉडेल देखील 15,450 रुपयांपर्यंतच्या डिस्काऊंटसह उपलब्ध आहेत.

इतर बातम्या

रिस्क है तो इश्क है, चांगल्या परताव्यासाठी FD ला बायपास हवा, एफडीपेक्षाही अधिकची कमाई देणारे पर्याय

हा तिरपेपणा ‘डोळस’ आहे, भारतीय नोटांवर का असतात तिरप्या रेषा; काय आहे त्याचा अर्थ? 

SBI च्या ग्राहकांना गिफ्ट, एकाच अकाउंटमध्ये तीन सेवा; बचत, डिमॅट आणि ट्रेडिंग खात्याचे लाभ

(Flipkart discount offer on Apple iPhone 13 series up to Rs 20000 approx via exchange offer)

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.