AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्लस मेंबर्ससाठी Flipkart Sale; iPhone 12 सह ‘या’ स्मार्टफोन्सवर तगडा डिस्काऊंट

फ्लिपकार्ट प्लस मेंबर्ससाठी बिग सेव्हिंग डेज सेल लाईव्ह झाला आहे. उर्वरित सदस्यांसाठी हा सेल 25 जुलैपासून लाईव्ह होईल.

प्लस मेंबर्ससाठी Flipkart Sale; iPhone 12 सह 'या' स्मार्टफोन्सवर तगडा डिस्काऊंट
iPhone 12 Mini
| Edited By: | Updated on: Jul 24, 2021 | 4:00 PM
Share

मुंबई : फ्लिपकार्ट प्लस मेंबर्ससाठी बिग सेव्हिंग डेज सेल लाईव्ह झाला आहे. उर्वरित सदस्यांसाठी हा सेल 25 जुलैपासून लाईव्ह होईल. हा सेल 29 जुलैपर्यंत असणार आहे. तसेच पाच दिवसांपर्यंत हा सेल चालणार आहे. त्यमुळे युजर्सना विविध उत्पादनं खरेदी करण्यासाठी अधिक वेळ मिळेल. फ्लिपकार्ट सेलदरम्यान स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्टवॉच, ऑडिओ प्रॉडक्ट्स, होम अ‍ॅक्सेसरीज आणि बऱ्याच प्रोडक्ट्सवर वेगवेगळ्या डील्स मिळतील. (Flipkart Big Saving Days sale started, big discount on smartphones like iPhone 12)

फ्लिपकार्टने या सेलमध्ये विविध उत्पादनांवर डिस्काऊंट देऊ केला आहे. सोबतच एक्सचेंज ऑफर, नो-कॉस्ट ईएमआयची सुविधादेखील आहेच. तुम्ही जर आयसीआयसीआय बँकेचे खातेदार असाल तर तुम्हाला त्वरित 10 टक्के सूट मिळू शकेल. आयसीआयसीआय बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरल्यास आपल्याला 10 टक्के सूट मिळेल. एचडीएफसी बँक खातेधारकांसाठी अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेल फायदेशीर ठरेल, तर फ्लिपकार्टची विक्री आयसीआयसीआय खातेधारकांसाठी खास आहे.

‘या’ स्मार्टफोन्सवर डिस्काऊंट

iPhone 12 – बिग सेव्हिंग डेज सेलदरम्यान आयफोन 12 चं 64 जीबी व्हेरिएंट 67,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या व्यतिरिक्त आपण आपला जुना फोन ट्रेड करु शकता आणि नवीन आयफोन 12 वर 19,250 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. इतकंच नव्हे तर आयसीआयसीआय बँक धारकांना आयफोन 12 वरही 10 टक्के सूट मिळेल.

Moto Razr 5G – हा फोन गेल्या वर्षी लॉन्च करण्यात आला होता. बिग सेव्हिंग डे सेलदरम्यान या फोनची किंमत 1,09,900 रुपयांवरून 89,999 रुपयांवर आली आहे. यात आयसीआयसीआय बँक धारकांना एक्सचेंज ऑफर, 10 टक्के त्वरित सवलत देखील समाविष्ट आहे. हे फोल्डेबल डिव्हाइस 5 जी सपोर्टसह येतं, यात 48 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच ट्विन डिस्प्लेदेखील आहे.

iPhone 12 मिनी – iPhone 12 सिरीजमधील सर्वात छोटा आयफोन 57,999 रुपयात खरेदी करता येईल. स्मार्टफोनची बेस प्राईस 64 जीबी व्हेरिएंटसाठी 69,900 रुपये इतकी आहे. तसेच, आपण आपलं जुनं डिव्हाइस एक्सचेंज करु शकतो, त्यात तुम्हाला चांगली ऑफर मिळेल. ही डील अधिक दमदार करण्यासाठी कंपनीने 19,250 रुपयांपर्यंतची सूट देऊ केली आहे. आयसीआयसीआय डेबिट आणि क्रेडिट कार्डधारक एकूण रकमेवर त्वरित 10 टक्के सूट मिळवू शकतात.

इतर बातम्या

48MP ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह Redmi Note 10T 5G लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

35000 रुपयांच्या डिस्काऊंटसह लॅपटॉप, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांची सूट, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

WhatsApp चं Joinable Group Calls फीचर लाँच, आता व्हिडीओ, ग्रुप कॉल अजून मजेदार होणार

(Flipkart Big Saving Days sale started, big discount on smartphones like iPhone 12)

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.