AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

iPhone Price Hike Reasons : आयफोनच्या किंमती वाढण्यामागचं नेमकं कारण काय? अॅपलने आधीच दिलेले संकेत

नवा iPhone 18 Pro लाँच झाल्यानंतर भारतात जुन्या आयफोनच्या किमती कमी होण्याऐवजी वाढल्या आहेत. iPhone 17 च्या 256GB मॉडेलची किंमत 82,900 रुपयांवरून 99,900 रुपये झाली असून 512GB मॉडेलची किंमत 1,24,900 रुपये झाली आहे.

iPhone Price Hike Reasons : आयफोनच्या किंमती वाढण्यामागचं नेमकं कारण काय? अॅपलने आधीच दिलेले संकेत
iPhone Price HikeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 10, 2026 | 9:55 PM
Share

नवीन आयफोन बाजारात आला की जुनी मॉडेल्स स्वस्त होणार आणि डिस्काउंटमध्ये फोन घ्यायचा, हा दरवर्षी  हिशेब लावणाऱ्या भारतीय ग्राहकांचा यंदा भलताच पोपट झाला आहे. अॅपलने iPhone 18 Pro सीरिज लाँच तर केली, पण सोबतच जुन्या आयफोन्सच्या किमती वाढवून ग्राहकांना मोठा शॉक दिला. नेहमीप्रमाणे किमती कमी होण्याऐवजी कंपनीने जुन्या आयफोन्सच्या किमतीत थेट 15 हजार ते 30 हजार रुपयांपर्यंतची प्रचंड वाढ केली आहे. थोडक्यात काय, तर iPhone 16, iPhone 17e, iPhone 17 आणि अगदी iPhone Air खरेदी करायचा असेल, तर आता खिशाला मोठी कात्री लागणार आहे.

कोणता मॉडेल किती महागला?

नवा iPhone 18 Pro लाँच झाल्यानंतर भारतात जुन्या आयफोनच्या किमती कमी होण्याऐवजी वाढल्या आहेत. iPhone 17 च्या 256GB मॉडेलची किंमत 82,900 रुपयांवरून 99,900 रुपये झाली असून 512GB मॉडेलची किंमत 1,24,900 रुपये झाली आहे. iPhone 17e ची किंमत 64,900 रुपयांवरून 79,900 रुपये, तर iPhone 16 ची किंमत 69,900 रुपयांवरून 89,900 रुपये झाली आहे. सर्वात मोठी वाढ iPhone Air च्या किमतीत झाली असून तो 1,19,900 रुपयांवरून थेट 1,49,900 रुपयांना पोहोचला आहे.

अचानक किमती वाढण्यामागचं कारण काय?

सध्या फक्त ॲपलच नाही, तर अँड्रॉइड स्मार्टफोन मार्केटमध्येही हेच चित्र आहे. या सगळ्यामागचं खरं व्हिलन ठरलंय ते म्हणजे AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सध्या जगभरात AI कंपन्या आणि डेटा सेंटर्सची प्रचंड लाट आली आहे. डेटा सेंटर्ससाठी मोठ्या प्रमाणावर मेमरी चिप्स आणि RAM ची गरज असल्याने त्यांची मागणी वाढली आहे. याच AI आणि डेटा सेंटर्सच्या वाढत्या मागणीचा थेट परिणाम आता स्मार्टफोनच्या किमतींवर होत असल्याची शक्यता आहे. कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी होत असल्याने पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला असून मेमरी चिप्सच्याही किमती वाढल्या आहेत. याचा परिणाम ॲपलसह अँड्रॉइड स्मार्टफोनच्या किमतींवर होत असल्याचं चित्र आहे. दरम्यान, ॲपलने या वर्षाच्या सुरुवातीलाच मॅकबुक आणि आयपॅडचे भाव वाढवून या भाववाढीचे संकेत दिले होते.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...