केवळ 7,999 रुपयात जबरदस्त फोन, 50MP चा कॅमेरा आणि बरेच काही
Lava स्मार्टफोन कंपनीने भारतीय बाजारात एक बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी क्षमता देण्यात आली असून 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

स्वदेशी स्मार्टफोन मेकर Lava स्मार्ट फोन कंपनीने Lava Bold N2 Pro हा फोन लाँच केला आहे. या फोनची किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या प्राईज रेंजमध्ये फोनला खास बनवण्यासाठी या फोनला खास डिस्प्ले, 50MP कॅमेरा आणि 128GB स्टोरेज सारखे फिचर्स देण्यात आले आहेत.
मोठी स्क्रीन आणि स्मूद एक्सपिरियन्स
Lava Bold N2 Pro मध्ये 6.75 इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला असून जो 120Hz रिफ्रेश रेट सोबत येत आहे. यामुळे स्क्रॉलिंग आणि डेली यूज खूपच स्मूद होऊ शकते. या प्राईज सेगमेंटमध्ये सर्वसाधारण 90Hz डिस्प्ले मिळतो. त्यामुळे एवढ्या कमी किंमतीत 120Hz डिस्प्ले एक मोठी गोष्ट आहे.
परफॉर्मेंस आणि सॉफ्टवेअर
या फोनमध्ये Unisoc T7250 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा प्रोसेसर बेसिक युज उदा. सोशल मीडिया, व्हिडीओ आणि कॉलिंगसाठी ठिकठाक परफॉर्मेंस देतो. यासोबत 4GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळत आहे. त्यामुळे या किंमतीत हा चांगला सौदा होऊ शकतो.
हा स्मार्टफोन Android 15 वर चालतो आणि यात क्लीन, जवळपास विना ब्लोटवेअर वाला एक्सपीरियन्स मिळत आहे.
कॅमरा आणि बॅटरी
फोटोग्राफीसाठी Lava Bold N2 Pro मध्ये 50MP चा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 8MPचा फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून जी संपूर्ण दिवस चालते असा दावा करण्यात आला आहे. यासोबत 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळत आहे
डिव्हाईस IP54 रेटिंग सोबत मिळतो. म्हणजे या हलके पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहील. याशिवाय या फोनमध्ये साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेंसर, डुएल सिम सपोर्ट, USB Type-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक सारखे फिचर्स आहेत.
किंमत आणि उपलब्धता
Lava Bold N2 Pro या स्मार्टफोनची भारतात किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन 4GB RAM आणि 128GB स्टोरेजच्या सिंगल व्हेरिएंटमध्ये येतो. हा स्मार्टफोन 6 एप्रिलपासून Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.यास Aurora Gold आणि Eclipse Grey कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येणार आहे.